कशेडी घाटात दरड कोसळल्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ठप्प झालाय. रात्रभर हा महामार्ग ठप्प राहणार आहे. आज मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी घाटात दरड कोसळली. त्यामुळे महामार्गावरची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. पोलादपूर पोलीस आणि एल अँड टीची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. आज रात्रभर दरड कोसळण्याचे काम सुरू राहणार आहे. या दरम्यान कशेडी घाट वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव यांनी दिली आहे.

मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूकडील वाहतुक बंद झाली आहे.महामार्ग प्राधिकरण आणि कंत्राटदार यांच्या मदतीने  दरड हटविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. अतिवृष्टीमुळे दरडी कोसळण्यास सुरवात झाली आहे. बुधवारी रात्री आणि गुरुवारी  सकाळी  विन्हेरे नातू मार्गावर दरड कोसळली होती. त्यामुळे महाड कडून खेडकडे जाणारा पर्यायी मार्ग बंद झाला होता. दरडीचे ढिगारे हटवून तो मार्ग मोकळा करण्यात आला.

गुरुवारी रात्री मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात पोलादपूर जवळ भली मोठी दरड कोसळली, त्यामुळे मुंबईकडे येणारी आणि गोव्याकडे जाणारी वाहतूक पुर्ण पणे बंद झाली. महामार्ग प्राधिकरण, ठेकेदार कंपनी आणि स्थानिक प्रशासनाने दरडीचे ढिगारे हटविण्याचे काम सुरु केले आहे. हे काम रात्रभर सुरु राहणार आहे. त्यामुळे सकाळपर्यंत महामार्गावरील वाहतुक बंद राहील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव यांनी दिली आहे. दरम्यान जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस सुरु आहे. कुंडलिका नदीने सलग दुसऱ्या दिवशी इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.