मंदार लोहोकरे

पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाला भक्तांची गर्दी वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने बुधवार पासून दर रोज दोन हजार भाविकांना दर्शनाची परवानगी देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे. मात्र दर्शनाला येणार्या भाविकांनी ऑनलाइन दर्शन बुकिंगच करावे लागणार असून इतर आरोग्य विषयक नियमाची अमलबजावणी होणार आहे.

New Year Welcome Kalyan,
कल्याण, डोंबिवलीत नववर्ष स्वागत यात्रांचा उत्साह; ढोल ताशांचा गजर, कलाकारांची उपस्थिती
अनोखी इफ्तार मेजवानी; हिंदू महिलांकडून मुस्लिम महिलांसाठी गोड भेट
Rejuvenation of water bodies Uran
वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी पाणवठे पुनर्जीवित
रोहित पवार म्हणाले, आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी दूध खरेदी करताना राज्य सरकारने मोठा घोटाळा केला आहे.
“आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी तब्बल १४६ रुपये/लिटर दराने दूध खरेदी”, रोहित पवारांकडून कथित दूध पुरवठा घोटाळ्याचा पर्दाफाश

दिवाळीतील पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरे खुली करण्यात आली. यात लाखो वैष्णावांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मंदिर देखील भाविकांसाठी खुले करण्यात आले. सुरवातील जो भाविक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या संकेतस्थळवरून दर्शनाची वेळ आणि तारीख निश्चित करेल अशाच भाविकांना दर्शना सोडण्यात येणार होते. मात्र १००० भाविकांचे ऑनलाइन बुकिंग फुल होत होते. त्यामुळे या बुकिंगची संख्या वाढविण्यात आली आहे. आता दर रोज २ हजार भाविकांना सकाळी ६ ते रात्री ९ या दरम्यान दर्शनाची सोय करण्यात आली आहे. बुधवार पासून याची अमलबजावणी होणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे.

मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी गाभारा, श्री विठ्ठल सभामंडप, रुक्मिणी सभामंडप,नामदेव पायरी, दर्शन रांग आदीची कर्मचाऱ्यांकडून  वेळोवेळी स्वच्छता करण्यात येत आहे. मंदिरात व नामदेव पायरी ते दर्शन रांगेत स्वच्छतेबरोबरच सॅनिटायझर फवारण्यात येत आहे. दर्शन रांगेत दोन भाविकांमध्ये सोशल डिस्टन्स राखला जाईल याची खबरदारी घेण्यात येत आहे. त्याचबरोबर मंदिरात येणाऱ्या भाविकांकरीता सॅनिटायझरची सोय, थर्मल स्क्रिनिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

शासनाच्या निर्देशानुसार मंदिरात दर्शनाकरीता येणार्याज भाविक, भक्तांनी मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. दर्शन नेहमीप्रमाणे सकाळी सहा वाजले पासून भाविकांना सोडण्यात येत आहे. सकाळी ६ ते ७, ८ ते ९,१० ते ११,११ ते १२, दुपारी १२ ते १,२ ते ३,३ ते ४,संध्याकाळी ५ ते ६,७ ते ८ आणि ८ ते ९ या कालावधीत प्रत्येक तासाला २०० भाविक या प्रमाणे १० तासासाठी दोन हजार भाविक दर्शन घेवू शकतील असे नियोजन करण्यात आले आहे. ऑनलाईन बुकींग http://www.vitthalrukminimandir.org/home.html
या संकेत स्थळावर तसेच http://117.214.89.131/qms1 हि लिंक Google Chrome,Mozila Firefox या वेब ब्राउजर वर कॉपी पेस्ट करावी आणि बुकिंग करावे असे आवाहनही विठ्ठल जोशी यांनी केले आहे

भाविकांसाठी नियमावली

* ऑनलाईन दर्शन बुकींग करावे लागणार
* भाविकांनी २४ तास अगोदर ऑनलाइन बुकींग करावे,
* मुख दर्शनाकरीता कासार घाट येथे पास तपासणी करुन दर्शनाला सोडणार
* करोनाची लक्षणे आढळणार्यांयना दर्शन प्रवेश बंद
*मंदिराच्या पूर्व गेट मधून भाविक दर्शनाला आत जातील तर व्हीआयपी गेटमधून बाहेर पडतील.
* दर्शन रांगेत फिजीकल डिस्टन्स (दोन भाविकात ६ फूट अंतर)
* अन्नक्षेत्र व प्रसाद व्यवस्था बंद राहिल
* सध्या ६५वर्षावरील नागरिक,१० वर्षाखालील बालक,  गर्भवती महिला, आजारी व्यक्ती यांनी दर्शनास येणे टाळावे