27 February 2021

News Flash

सावळ्या विठुरायाच्या दर्शनाने भाविकांच्या दिवाळीचा आनंद द्विगुणीत

पाडवा,भाऊबीजेनिमित्त आकर्षक फुलांची सजावट

मंदार लोहोकरे

लाखो वैष्णावांचे श्रद्धास्थान असलेल्या परमात्मा  पांडुरंग आणि रुक्मिणी मातेचे मुखदर्शन आजपासून सुरवात झाली. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने दिवाळी पाडवा, भाऊबीज या सणाचे औचित्य साधत फुलांची आकर्षक सजावट केली. पुण्यातील संतोष तानाजी वाळके या भाविकाने या फुलांची सजावट सेवा केल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली. या फुलांच्या सजावटीत देवाचे लोभस रूप भाविकांनी डोळ्यात साठवले. मंदिर समितीने आरोग्याची काळजी घेत दर्शन व्यव्यस्था चांगली ठेवली आणि देवाच्या विठुरायाच्या दर्शनाने एक सात्विक उर्जा प्राप्त झाल्याचे रामेश्वर राव या भाविकाने भावना व्यक्त केल्या.

राज्य सरकारने मंदिरे दर्शनासाठी खुली करण्याच्या निर्णयाची अमलबजावणी आज झाली. १७ मार्च रोजी श्री विठ्ठल मंदिर करोनाच्या पार्श्वभूमीवर दर्शनासाठी बंद ठेवले होते. त्या नंतर माघी,चैत्री आणि आषाढी वारी भाविकाविना साजरी करण्यात आली. मात्र गेल्या महिन्यात करोनाचे रुग्ण कमी होऊ लागल्यावर मंदिरे सुरु करा अशी मागणीने जोर धरला होता. या पार्श्वभूमीवर काही निर्बंध घालत मंदिरे दर्शनासाठी खुली करण्याचा निर्णय घेतला.या बाबत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीने बैठक घेवून दर्शनाची व्यवस्था,नियोजन करण्यात आले. दर रोज एक हजार भाविकांना सकाळी ६ ते रात्री ९ वाजे पर्यंत दर्शन देण्यात येणार आहे. श्री विठ्ठलाचे आणि रुक्मिणी मातेचे पदस्पर्श दर्शन घेतले जाते. मात्र या वर निर्बंध आणीत आता केवळ मुख दर्शन करता येणार आहे.

तसेच दर्शनासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची www.vitthalrukminimandir.org या संकेतस्थळावरून दर्शनाची तारीख वेळ निश्चित करावी लागणार आहे. आणि ज्या भाविकांनी संकेतस्थळवरून दर्शनाची वेळ घेतली आहे.त्याच भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे. तसेच भाविकांनी ओळखपत्र आणणे बंधनकारक आहे. श्री विठ्ठल रुक्मिनिमातेचे दर्शन सकाळी ६ ते ७, ८ ते ९,१० ते ११,११ ते १२, दुपारी १२ ते १,२ ते ३,३ ते ४,संध्यकाळी ५ ते ६,७ ते ८ आणि ८ ते ९ या कालावधीत भाविकांना दर्शन घेता येईल अशी माहिती कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे.मास्क,योग्य अंतर,सॅनिटायझरचा वापर आदी शासनाच्या सूचनेचे पालन करावे लागणार आहे. तसेच ६५ वर्षा पुढील,१० वर्षाखाली आणि गर्भवती महिलांना दर्शनासाठी परवानगी नाही.

या साऱ्या पार्श्वभूमीवर आज सकाळी ६ वाजता दर्शनास सुरवात झाली. दोन दिवसापूर्वी चेन्नई येथून रामेश्वर राव हे सपत्नीक पंढरीत आले होते. त्यांनी काल तातडीने संकेतस्थळावरून दर्शनाचे बुकिंग केले आणि आजचे दर्शन घेणारे पहिले भाविक ठरले. गेल्या वर्षी दर्शनाला आलो होतो. मात्र करोनामुळे येऊ शकलो नाही.पण सुदैवाने दर्शनासाठी मंदिरे खुली झाली आणि विठ्ठलाचे दर्शन घेतले.त्यामुळे एक सात्विक उर्जा पारपत झाल्याची भावन त्यांनी व्यक्त केली. तर मंदिर समितीने आरोग्य विषयक उपाय योजना चांगल्या ठेवल्या आहेत. पोलिसांनी मदत करीत सहकार्य केले. खूप आनंद झाला अशी प्रतिक्रिया त्यांच्या पत्नीने दिली. आज पाड्या निमित्त मंदिर्त आकर्षक फुलांची आरास केली आहे. विठू माझा लेकुरवाळा…संगे भक्तांचा मेळा या अभंगा प्रमाणे देवाला भक्ताची आणि भक्ताला देवाची भेट  आनंद द्विगुणीत करणारी ठरली असे म्हंटल तर वावग ठरणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2020 11:18 am

Web Title: darshan of vitthal temple also started from today scj 81
Next Stories
1 पाडव्याच्या मुहूर्तावर दर्शन घेण्यासाठी महालक्ष्मी चरणी भाविकांची रीघ
2 “हाथरसच्या नावाने गरळ ओकणाऱ्या राज्य सरकारचा गळा आता कुणी धरला आहे?”
3 भक्तांच्या श्रद्धेचा विजय – पाटील
Just Now!
X