24 February 2021

News Flash

दातेंची नियुक्ती झावरेंच्या मागणीमुळे रद्द;

ज्या वसंतराव झावरे यांनी रोपटे वाढविले, त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसणाऱ्या काशीनाथ दाते यांना जिल्हाध्यक्षपदाची संधी देऊ नका अशी मागणी करीत सुजित झावरे यांनी

| June 25, 2014 01:45 am

 ज्या वसंतराव झावरे यांनी रोपटे वाढविले, त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसणाऱ्या काशीनाथ दाते यांना जिल्हाध्यक्षपदाची संधी देऊ नका अशी मागणी करीत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना दाते यांची नियुक्ती रदद करण्यास भाग पाडले.
    राष्ट्रवादी कांग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा घनश्याम शेलार यांनी राजीनामा दिल्यानंतर अनपेक्षितरित्या अवघ्या दोन तासात काशीनाथ दाते यांचे नाव जिल्हाध्यक्ष म्हणून जाहीर झाले. पक्षाचे निरीक्षक अंकुश काकडे यांनीही या वृत्तास दुजोरा देत सोमवारी दुपारी दाते यांना पदभार देण्यात येणार असल्याचे सांगितले होते. दाते यांच्या या नियुक्तीनंतर त्यांचे कटटर विरोधक सुजित झावरे यांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळीत पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी चर्चा करून भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगितले होते.
    दाते यांचे नाव जाहीर झाल्यानंतर ढवळपुरी येथील कार्यक्रमानंतर त्यांनी तडक नगर गाठून माजी जिल्हाध्यक्ष दादा कळमकर, आ. बबनराव पाचपुते यांच्यासह इतर ज्येष्ठ नेत्यांशी  चर्चा  केली. योगायोगाने पक्षाध्यक्ष शरद पवार हे सोमवारी सकाळी पुण्यात कार्यक्रमानिमीत्त येणार असल्याने त्यांची सकाळी भेट घेण्याचे ठरले.
    ज्या ज्या ठिकाणी दाते गेले त्या त्या ठिकाणी त्यांनी गद्दारी केली, भांडणे लावली. ते कधीही एखादया व्यक्तीशी एकनिष्ठ राहत नाहीत. ज्या वसंतराव झावरे यांनी पक्षाचे रोपटे लावले त्याच वसंतराव झावरे याच्या पाठीत दाते यांनी खंजीर खुपसला. अशा माणसाला जिल्हाध्यक्ष पदाची संधी देऊ नका अशी  विनंती करीत सुजित झावरे यांनी भाजपा सेनेतून पक्षात आलेल्या लोकांना लगेच पदे दिली जात असल्याची भावना निर्माण झाल्याचे पवारांच्या निदर्शनास आणून दिले. नव्याने पक्षात आलेल्या लोकांना संधी दिली जात असल्याची कार्यकर्त्यांमध्ये खंत असल्याचेही झावरे यांनी यावेळी सांगितले.
    सोमवारी सकाळी साडेनउ वाजता पुण्यातील मोदी बागेत झावरे यांनी पवारांची भेट घेऊन आपली भूमिका मांडल्यानंतर पवार यांनी लगेच जितेंद्र आव्हाड तसेच पालकमंत्री मधुकरराव पिचड यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. दाते यांना पद न देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. अध्यक्षपदाचे पत्र आदा करण्यात आल्याचे आव्हाड यांनी सांगितल्यानंतर ते रदद करण्याचेही पवार यांनी सुचविले. झावरे यांच्यासमवेत आ. बबनराव पाचपुते, माजी जिल्हाध्यक्ष दादा कळमकर यांच्यासह आणखी तिन ते चार ज्येष्ठ  नेते होते.
    विधानसभा निवडणूकीतील उमेदवारीचे काय होईल ते होईल सध्यातरी जिल्हाध्यक्षपद काटून सुजित झावरे यांनी दाते यांचा गेम केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसअंतर्गत असलेली गटबाजी आणखीच उफाळून येईल यात शंका नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 25, 2014 1:45 am

Web Title: dates appointment cancelled after zhavares demand
Next Stories
1 पारनेर तालुक्यातील रस्ते व पुलांसाठी दीड कोटीचा निधी मंजूर
2 पगारवाढीच्या घोषणेने वीज कर्मचाऱ्यांचे चेहरे उजळले!
3 शतकोटीचा बोजवारा, आता ग्रुपिंगची लगबग!
Just Now!
X