News Flash

दाऊदच्या गँगस्टरला 20 वर्षांनंतर मुंब्रा येथून अटक

जामिनावर सुटल्यानंतर महाडिक कर्नाटकात फरार झाला, बनावट पासपोर्ट तयार करून तो देश सोडून गेला आणि 17 वर्ष...

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीतील एका गँगस्टरला तब्बल 21 वर्षांनी अटक करण्यात आली आहे. मोहम्मद अहमदखान महाडिक (57) असे या गँगस्टरचे नाव असून खून, खंडणीसारखे अनेक गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. ठाण्यातील मुंब्रा येथून त्याला अटक करण्यात आली आहे.

महाडिक याने 1991मध्ये हैदर नावाच्या व्यक्तीचा खून केला होता. त्याला अटकही झाली होती. मात्र 1998मध्ये जामिनावर सुटल्यानंतर तो कर्नाटकात फरार झाला होता. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते पण तो पोलिसांच्या हाती लागला नाही. त्यानंतर 2001 मध्ये नाव बदलून पठाण युसुफखान उस्मान या नावाने बनावट पासपोर्ट तयार करून तो देश सोडून गेला आणि 17 वर्ष मस्कतमध्ये राहिला. आठ महिन्यापूर्वीच तो मुंब्रा कौसा येथील अमरेशपार्क इमारतीत पत्नीसह राहण्यास आला होता.

‘आम्हाला महाडिक मुंबईत परतल्याची कुणकुण लागली होती, तो मुंब्र्यात पत्नीसह राहत असल्याची माहिती मिळताच त्याला अटक करण्यात आली’ अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी दिली. नितीन ठाकरे यांच्या पथकाने सोमवारी महाडिक याला बनावट पासपोर्टसह मुंब्र्यातून अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2018 11:44 am

Web Title: dawood ibrahim gangster arrested after 20 years from mumbra
Next Stories
1 5 जानेवारीला सरकारी अधिकारी संपावर
2 छगन भुजबळांनी मनुस्मृतीचं केलं दहन
3 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
Just Now!
X