अवैध दारू, कोळसा चोरी, सुगंधी गुटखा व रेती तस्करीमुळे चंद्रपूर जिल्ह्यात सध्या माफिया राज सुरू आहे. या अवैध उद्योगांमधील संघर्षातून आज बल्लारपूर शहराच्या मुख्य चौकात कोळसा व्यवसायिक सूरज बहुरिया या तरुणाची बंदुकीतून सहा गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे बल्लारपूर शहर हादरले असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

बल्लारपूर शहरातील जुना बस स्थानक परिसरातून आपल्या चारचाकी गाडीतून बामणीकडे जात असलेल्या सुरज बहुरिया या तरुणावर भर चौकात गोळीबार करण्यात आला. आज (शनिवार) दुपारी अडीज ते तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Bloodshed because of professional competition in Gondia Sand businessman killed in firing
गोंदियात व्यावसायिक स्पर्धेतून रक्तपात; गोळीबारात वाळू व्यावसायिकाचा मृत्यू
Pune, firing, Firing on youth,
पुणे : शहरात गोळीबारची तिसरी घटना, काडीपेटी न दिल्याने तरुणावर गोळीबार
Gudi Padwa Nagpur
नागपुरात गुढीपाडव्याला बाजारात उत्साह, ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी
policeman committed suicide by shooting himself in the head
नागपूर : डोक्यात गोळी झाडून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; कामाचा ताण की…

घटनेची खबर कळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ धाव घेतली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार काँग्रेसचा कार्यकर्ता असलेल्या सुरज बहुरियावर अंदाजे ५ ते ६ गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेनंतर त्याला तत्काळ चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

आणखी वाचा- हिंगोली : कळमनुरी नगराध्यक्षांसह १२ नगरसेवका विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

दरम्यान, घटना घडल्यानंतर अवघ्या तासाभरातच पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. तसेच पुढील तपास उपविभागीय पोलीस अधीकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवलाल एस. भगत यांच्यासह बल्लारपूर पोलीस करीत आहेत.