News Flash

मृतदेहाची चोरी

जत तालुक्यातील घटना

(प्रतिकात्मक छायाचित्र)

चोरी कशाची होऊ शकते असा प्रश्न जर विचारला तर, सोने, नाणे, दागिने या चल संपत्तीबरोबरच धान्य, जनावरे, वस्तू यांचीही चोरी आíथक लाभासाठी होते असे उत्तर मिळू शकेल. मात्र मातीत गाडल्या गेलेल्या मृतदेहाची चोरी होण्याची अजब घटना जत तालुक्यात उघडकीस आली आहे. ज्या मृतदेहाची कवटी गायब झाली तो मृतदेह तब्बल दोन शतकांपूर्वी दफन करण्यात आला होता. याबाबत जत पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जत तालुक्यातील हळ्ळी या गावी बेळुडगी रोडवर मागासवर्गीय समाजाची स्वतंत्र स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीमध्ये दफन करण्यात आलेल्या काही मृतदेहांवर थडगीही बांधण्यात आली आहेत. मंगळवारी काही नागरिक स्मशानभूमीत गेले असता त्यांना एका ठिकाणी स्मारकाची नासधूस करत ते उकरण्यात आल्याचे दिसून आले. जमिनीत सुमारे तीन ते चार फूट खाली उकरून आतील मृतदेहाची कवटी गायब करण्यात आल्याचे दिसून आले. मात्र या ठिकाणी मृतदेहाचे अन्य अवशेष असल्याचे आढळून आले असले तरी कवटी मात्र गायब करण्यात आली आहे. कवटी गायब झाल्याचे समजल्याने पाहण्यासाठी गावातील लोकांची गर्दी झाली. या ठिकाणी मंदिराचा पुजारी येळुडगी आज्जा यांच्या मृतदेहावर दफन विधी करण्यात आला होता असे जाणकाराकडून सांगण्यात आले. याबाबत जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2017 2:56 am

Web Title: dead body theft in sangli
Next Stories
1 दानवे यांची आजपासून शेतकरी शिवार संवाद यात्रा
2 तेंदू कंत्राटदारांकडून जप्त केलेली ‘ती’ रक्कम खंडणी की मजुरी?
3 किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यावर सरकारला जाग येणार
Just Now!
X