News Flash

सातारा : जिल्हा रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात आढळले मृत अर्भक; चौकशीचे आदेश

सोशल मीडियावर जोरदार चर्चा आणि अफवांना ऊत

संग्रहित छायाचित्र

सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात मृतावस्थेतील अर्भक सापडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. बुधवारी ही बाब उघडकीस आल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

जिल्हा रुग्णालयात रोजच्याप्रमाणे साफसफाईचे काम सुरु असताना वॉर्ड क्रमांक सातच्या स्वच्छतागृहात मृत अर्भक स्वच्छता कर्मचाऱ्यांना दिसून आले. या स्वच्छतागृहात पाणी साठून राहत असल्याने याची सफाई करण्यात आली यावेळी हा प्रकार उघडकीस आला. याबाबत सातारा शहरात वेगवेगळ्या अफवा पसरल्या होत्या. समाज माध्यमातूनही याची जोरदार चर्चा झाली. सुरुवातीला याबाबत प्रमुख डॉक्टरांशी संपर्क होत नसल्याने या गोंधळात आणखी भर पडली होती. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाल्याने या घटनेबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या.

दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांच्याशी बुधवारी उशीरा संपर्क झाल्यानंतर त्यांनी या घटनेबाबत स्पष्टीकरण दिले. गडीकर म्हणाले, “२७ जुलै रोजी वीस आठवड्यांची एक गर्भवती महिला चौथ्यांदा बाळंतपणासाठी रुग्णालयात दाखल झाली होती. त्यावेळी डॉक्टरांनी तिला तपासले असता तिची प्रकृती नाजूक होती व बाळ पोटातच दगावले होते. दरम्यान, उपचार सुरु असताना संबंधित महिला, डॉक्टर आणि परिचारिकांची नजर चुकवून विनापरवानगी स्वच्छता गृहात गेली. यावेळी तिचे मृत अर्भक स्वच्छतागृहात पडल्याचे आढळून आले. त्यानंतर सफाई कर्मचारी व व्यवस्थापनाने हे मृत अर्भक २९ जुलै रोजी महिलेच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले. याबाबत महिलेच्या नातेवाईकांची कोणतीही तक्रार नाही. या महिलेवर उपचार पूर्ण झाल्यानंतर तिला घरी सोडण्यात आले आहे. याबाबतची माहिती चुकीच्या पद्धतीने समाज माध्यमातून प्रसिद्ध झाली आहे. याबाबत मी चौकशीचे आदेश दिले असून चार जणांच्या समितीकडून या विषयाची चौकशी केली जाणार आहे. अहवालात कोणी दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल.”

जिल्हाधिकाऱ्यांचेही चौकशीचे आदेश

या अतिसंवेदनशनील बाबीची सविस्तर चौकशी होणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी तात्काळ चौकशी समितीची नियुक्ती केली. तसेच १४ ऑगस्टपूर्वी याचा चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 9:06 am

Web Title: dead infant found in satara district hospital toilet inquiry orders aau 85
Next Stories
1 बससेवा बंद, नोकरदारांचे हाल
2 काळी-पिवळी वाहन चालकाचा मुलगा ‘यूपीएससी’त अव्वल
3 संक्रमण रोखण्यासाठी मोहीम
Just Now!
X