18 January 2019

News Flash

तुकाराम मुंढेंच्या मध्यस्थीमुळे १०३ वर्षांनी मिळाला मृत्यूचा दाखला

नाशिकचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मध्यस्थीमुळे तब्बल १०३ वर्षानंतर एका व्यक्तीच्या कुटुंबियांना मृत्यूचा दाखला मिळाला आहे

तुकाराम मुंढे

नाशिकचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मध्यस्थीमुळे तब्बल १०३ वर्षानंतर एका व्यक्तीच्या कुटुंबियांना मृत्यूचा दाखला मिळाला आहे. निजामुद्दीन नजरअली पिरजादा यांचा १९१५ मध्ये मृत्यू झाला होता. मात्र अद्यापही त्यांच्या कुटुंबियांना मृत्यू दाखला मिळाला नव्हता. तुकाराम मुंढे यांनी दखल घेत हे प्रकरण निकाली काढलं आहे.

निजामुद्दीन नजरअली पिरजादा यांचा १९१५ मध्ये ब्रिटीश राजवटीत मृत्यू झाला होता. त्यावेळी हा दाखला मोडी लिपीत लिहिण्यात आला होता. दाखल मोडी लिपीत असल्या कारणाने महापालिका कर्मचाऱ्यांनी अनेकदा कारणं देत मृत्यू दाखला देण्यास टाळाटाळ केली होती.

अखेर कुटुंबियांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे जाऊन आपली व्यथा मांडली. तुकाराम मुंढेंनी तात्काळ दखल घेत मृत्यू दाखला मिळवून दिला. अशाप्रकारे तब्बल १०३ वर्षानंतर निजामुद्दीन नजरअली पिरजादा यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला आहे.

First Published on May 16, 2018 6:45 pm

Web Title: death certificate issued after 103 years