News Flash

चोर समजून केलेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू

चंद्रपुरातील रहिवासी असलेल्या पंकज व अविनाश या दोघांना अष्टभूजा वार्डातील रुबेल नावाच्या मित्राकडे जायचे होते.

(संग्रहित छायाचित्र)

दुसरा युवक जखमी, चार जणांना अटक

मित्राचे घर शोधणाऱ्या दोन युवकांना चोर समजून नागरिकांनी झाडाला बांधून लाठीकाठीने बेदम मारहाण केली. या घटनेत एका युवकाचा मृत्यू झाला, तर एक जखमी झाला. ही घटना चंद्रपूर शहरातील पागलबाबा नगर येथे गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. पंकज लांडगे (२५, रा. तुकूम), असे मृत युवकाचे नाव आहे, तर अविनाश हरिराम किल्लो (२६) असे जखमी युवकाचे नाव आहे. याप्रकरणी जखमी युवकाने पोलिसात तक्रार देताच चार जणांना अटक करण्यात आली आहे.

चंद्रपुरातील रहिवासी असलेल्या पंकज व अविनाश या दोघांना अष्टभूजा वार्डातील रुबेल नावाच्या मित्राकडे जायचे होते. मात्र त्याचे घर माहीत नसल्याने त्यांनी पागलबाबा नगरातील एका महिलेला त्याच्या घराचा पत्ता विचारला. मात्र चोर समजून महिलेने आरडाओरड सुरू केली. दरम्यान, परिसरातील नागरिक लाठीकाठी घेऊन त्यांच्याकडे धावले. त्यामुळे पंकज व अविनाश घाबरून पळायला लागले. यावेळी नागरिकांनी त्यांना पकडून झाडाला बांधून लाठीकाठीने मारहाण केली. पंकज व अविनाश त्यांना सोडण्यासाठी विनवण्या करीत होते. मात्र त्यांचे नागरिकांनी काहीही ऐकले नाही. याबाबत माहिती होताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, रामनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक मिलिंद पारडकर तसेच रामनगर पोलिसांची चमू घटनास्थळावर पोहोचली. यावेळी पोलिसांनी नागरिकांना बाजूला केले. मात्र तोपर्यंत पंकजचा मृत्यू झाला होता. अविनाशने दिलेल्या तक्रारीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद पारडकर यांच्या पथकांनी चार जणांना अटक केली.

जनरल सिंग कष्टी (३५), सतपालसिंग मट्टू (३७), गुरुदित्ता मट्टू (२२), करणजित सिंग (१८) सर्व राहणार अष्टभूजा वार्ड यांना अटक करण्यात आली.  शुक्रवारी सकाळी चोघांनाही न्यायालयात दाखल केल्यानंतर २३ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2019 2:24 am

Web Title: death of a young man in connection with a thiefs assaults akp 94
Next Stories
1 हे अमर, अकबर, अ‍ॅन्थोनी सरकार
2 CAA Protest : सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध : मराठवाडय़ात मोर्चे, बंद, दगडफेक, जाळपोळही
3 बदलत्या वित्तस्थितीत आर्थिक नियोजन कसे असावे?
Just Now!
X