12 August 2020

News Flash

सांगलीत दोघांचा मृत्यू; २३९ नवे रुग्ण

सांगली, मिरज आणि कूपवाड या तीन शहरातील बाधितांची संख्या दीड हजारांवर

प्रतिकात्मक छायाचित्र

जिल्ह्य़ात शनिवारी दुपापर्यंत दोन करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून कालच्या २३९ इतक्या विक्रमी रुग्णसंख्या आढळलेल्या महापालिका क्षेत्रामध्ये शनिवारी दुपापर्यंत तब्बल ७८ जणांचा करोना चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे. यामुळे सांगली, मिरज आणि कूपवाड या तीन शहरातील बाधितांची संख्या दीड हजारांवर गेली आहे.

खानापूर तालुक्यातील वेजेगाव आणि जत शहरातील एका युवकाचा आज सकाळी रुग्णालयात उपचार सुरू असताना करोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्य़ात दुपापर्यंत करोनाबळींची संख्या ८० वर पोहोचली आहे.

करोना नियंत्रण कक्षामधून शुक्रवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या माहितीनुसार विक्रमी म्हणजे ३३९ नवीन करोनाबाधित एका दिवसात समोर आले. यापकी महापालिका क्षेत्रामध्ये तब्बल २५४ रुग्ण आढळून आले. शहर आणि ग्रामीण भागामध्ये जलद अ‍ॅन्टिजेन चाचणी सुरू केल्याने रुग्णसंख्या वाढत आहे.

आज दुपापर्यंत सांगलीसह मिरज आणि कूपवाड शहराच्या विविध भागामध्ये ७८ जणांचे करोना चाचणी अहवाल सकारात्मक आले आहेत. यामुळे महापालिका क्षेत्रातील बाधितांची संख्या दीड हजारांवर गेली आहे. रात्रीपर्यंत रुग्णांच्या संख्येमध्ये आणखी भर पडण्याची शक्यता आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2020 12:05 am

Web Title: death of two in sangli 239 new patients abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 अण्णा भाऊ साठेंना ‘भारतरत्न’ने सन्मानित करावे – जयंत पाटील
2 सोलापुरात महिन्यात करोनाचे सहा हजार रुग्ण; १९५ मृत
3 भौतिक विकासासोबतच मूल्याधिष्ठित संस्कार महत्त्वाचे – नितीन गडकरी
Just Now!
X