पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि सोलापूर या भागात पूरबळींची संख्या आता ५४वर पोहोचली आहे. तर चार लोक अद्यापही बेपत्ता आहेत. त्याचबरोबर या भीषण नैसर्गिक आपत्तीमध्ये १९,७०२ घरे कोसळली आहेत.

पंधरादिवसांपूर्वी सांगली, कोल्हापूर भागात भीषण पूरस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. अनेकांचा संसार वाहून गेले आहेत. शेती आणि पशूधनाचेही मोठे नुकसान झाले आहे. या पूरातील बळी गेलेल्यांचा आकडा आता ५४वर पोहोचला आहे. तर ४ लोक अद्यापही बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे. यामध्ये ८००० जनावरांचाही बळी गेला आहे. त्याचबरोबर १९,७०२ घरे उद्ध्वस्त झाली आहेत.