डान्सबार बंदी उठवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा छमछम सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा निर्णय पाळावा लागणार असला तरीही सुप्रीम कोर्टात सरकार बाजू मांडण्यात कमी पडलं असं राष्ट्रवदीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी म्हटलं आहे. तसंच हा निर्णय दुर्दैवी असल्याचीही प्रतिक्रिया विद्या चव्हाण यांनी दिली आहे.

डान्सबारसंदर्भातल्या राज्य सरकारने घालून दिलेल्या जाचक अटी सुप्रीम कोर्टाने शिथील केल्या आहेत. यामुळे मुंबईसह राज्यात डान्सबार सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संध्याकाळी ६ ते रात्री ११.३० पर्यंत डान्सबार सुरु राहणार आहेत. सुप्रीम कोर्टाचा निर्णय असल्याने तो मान्य करावा लागणार आहे. मात्र हा निर्णय दुर्दैवी आहे असं मत राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी दिली आहे.

राज्यात डान्सबार सुरु होते तेव्हा अनेक अल्पवयीन मुलींना या व्यवसायात ढकलले जात होते. प्रसंगी त्यांचे लैंगिक शोषणही केले जात असे. तसेच अनेक पुरुष घर खर्चाचा पैसा डान्सबारमध्ये उधळत. अनेकांचे संसार डान्सबारमुळे देशोधडीला लागले या सगळ्या परिस्थितीचा विचार करून आघाडी सरकारने डान्सबार बंदीचा निर्णय घेतला होता. मात्र विद्यमान सरकार डान्सबारबंदी संदर्भात बाजू मांडण्यात कमी पडलं असेही विद्या चव्हाण यांनी म्हटलं आहे.