कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये येणा-या गुळाच्या विक्रीबाबत सर्व संबंधित अधिका-यांची बठक घेऊन शेतक-यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, असे प्रतिपादन सहकार व पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये येणा-या गूळविक्रीबाबत सíकट हाऊस येथे आयोजित केलेल्या बठकीत पाटील बोलत होते. बठकीस एन. डी. पाटील, पणन मंडळाचे मिलिंद आकरे, उपनिबंधक शिरापूरकर, रंजन लाखे यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी व गूळ उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
पणनमंत्री पाटील म्हणाले, कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये गूळ विक्रीसंदर्भात शासनाने दिनांक ३ मार्च २०१३ रोजी काढलेल्या परिपत्रकाबाबत सर्व संबंधित अधिका-यांची बठक घेऊन निर्णय घेण्यात येईल. या परिपत्रकात आवश्यक ते बदल करून शेतक-यांचे हित जोपासले जाईल. तसेच गूळ संशोधन केंद्राबाबत सबंधितांनी आपले प्रस्ताव सादर करावेत. त्यांच्या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून त्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल.
कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये येणा-या गुळाची विक्री झाल्यानंतर संबंधित शेतक-याला त्याचे पसे मिळवून देण्याची जबाबदारी कृषिउत्पन्न बाजार समितीने घ्यावी, अशी मागणी एन. डी. पाटील यांनी केली. तसेच गूळ उत्पादक शेतक-यांच्या असणा-या समस्याही मंत्रिमहोदयांच्या समोर त्यांनी मांडल्या.
 पणन मंडळाचे मिलिंद आकरे म्हणाले, शासन परिपत्रकानुसार कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये येणा-या गुळाच्या सौद्यामध्ये लायसेन्स नसणा-या व्यापा-यासही भाग घेता येतो. अशा सौद्याची नोंद मार्केट कमिटी करणार आहे.
या वेळी गूळ उत्पादक शेतकरी, व्यापारी, आडते यांनी आपापल्या समस्या मंत्रिमहोदयांच्या समोर मांडल्या. या समस्यांचे निराकरण केले जाईल असे पाटील यांनी सांगितले.