27 February 2021

News Flash

दिलासादायक : राज्यात करोनाच्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट

रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले

(संग्रहित छायाचित्र)

राज्यातील करोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या घटल्याची माहिती आजच्या दिवसभरातील आकडेवारीमधून समोर आली आहे. त्याचबरोबर रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. यावरुन राज्यात करोनाच्या संसर्गाचे काही प्रमाणात नियंत्रणात असल्याचे चित्र आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

या माहितीनुसार, राज्यात आज ४३०४ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर नव्याने ४६७८ करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे एकूण १७,६९,८९७ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ६१,४५४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९४.१ टक्के झाले आहे.

पुण्यात दिवसभरात ३०२ रुग्ण आढळले, ७ रुग्णांचा मृत्यू

पुणे शहरात दिवसभरात ३०२ करोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे आज अखेर एकूण रुग्णसंख्या १,७४, ७५४ इतकी झाली आहे. तर आज ७ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण रुग्णसंख्या ४ हजार ५५६ इतकी झाली आहे. दरम्यान, २९३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. तर आजअखेर १,६५, २४६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2020 9:24 pm

Web Title: decrease in the number of active corona patients in the state aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी श्रीरंग गोडबोले
2 अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण : अर्णब गोस्वामींसह तिघांना न्यायालयाचे समन्स
3 सरपंचपदाच्या सर्व आरक्षण सोडती रद्द; निवडणुकीनंतर पुन्हा नव्याने होणार प्रक्रिया
Just Now!
X