मलेशियन डॉर्फ ही नारळाची प्रजाती अतिशय उपयुक्त असण्याबरोबरच जिल्ह्य़ात या प्रजातीच्या रोपांना मोठय़ा प्रमाणात मागणी असते. तथापि सध्या पालघर जिल्ह्य़ातून ही रोपे आणावी लागतात व शेतकऱ्यांना यासाठी खूप खर्च येतो. यासाठीच यंदाच्या वर्षीच सिंधुदुर्गात मलेशियन डॉर्फ प्रजातीची नारळ रोपे उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्य़ात नर्सरी उभारली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री केसरकर यांनी सावंतवाडी येथे बोलताना दिली.

सावंतवाडी येथील बॅ. नाथ पै सभागृहात आयोजित जागतिक नारळ दिन कार्यक्रमात पालकमंत्री प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग श्रीफळ असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश गवस, कोषाध्यक्ष रामानंद शिरोडकर, नारळ संशोधक डॉ. दिलीप नागवेकर, नारळ विकास बोर्डाचे उपसंचालक प्रमोद कुरियन उपस्थित होते.

Benefits of Millets
नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणात कोणती बाजरी खावी? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात…
Loksatta explained Due to the continuous increase in mustard production, the discussion of yellow revolution is starting
विश्लेषण: देश पिवळय़ा क्रांतीच्या दिशेने..
tigress archi video marathi news, loksatta tiger video marathi news
VIDEO: आर्चीच्या बछड्यांची ‘मस्ती की पाठशाला’, टिपेश्वरच्या जंगलातील दंगामस्ती कॅमेऱ्यात कैद
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?

नारळाला श्रीफळ असे संबोधले जाते. नारळापासून निरा, सोडणापासून काथ्या अशी अनेक उत्पादने हाती येतात असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, सिंधुदुर्ग नारळाच्या उत्पादनात व लागवडीत अग्रेसर असला तरी आता जुन्या नारळ बागांचे पुन:रुज्जीवन करणे क्रमप्राप्त आहे. नवीन नारळ प्रजातींच्या लागवडीवर भर देणे गरजेचे आहे.

नारळ बागांत आंतरपीक घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. नारळ बागायतदारांनी सूक्ष्म सिंचनाद्वारे पाणी पद्धतीचा वापर करून आंतरपिकाबरोबरच नारळाच्या उत्पादन वाढीवर भर देणे आवश्यक आहे. यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांबरोबरच नारळ विकास बोर्डाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त होण्याची गरज आहे.

श्री. रामानंद शिरोडकर या वेळी बोलताना म्हणाले की, २ सप्टेंबर १९६९ साली आशिया खंडामध्ये नारळ विकासासाठी संघटना निर्माण करण्यात आली. या संघटनेचा भारत हा संस्थापक देश आहे. या वर्षी दरवर्षी विश्वात २ सप्टेंबर हा दिवस जागतिक नारळ दिन म्हणून साजरा केला जातो. ते पुढे म्हणाले, सिंधुदुर्गात १२ ठिकाणी काथ्या प्रक्रिया उद्योग सुरू झाले आहेत. हे काथ्या प्रक्रिया उद्योग सक्षमपणे सुरू राहण्यासाठी नारळ बागायतदारांनी सोडण पुरवठा मोठय़ा प्रमाणात करायला हवा. नारळ विकास बोर्डाने जुन्या नारळ बागांचे पुन:रुज्जीवन करण्यासाठी विकास योजना राबविण्याची आवश्यकता आहे.

या वेळी सिंधुदुर्ग नारळ उत्पादक संघाचे अध्यक्ष सुरेश गवस यांनी निरा विक्री परवाना शासनाने लवकरात लवकर द्यावा, अशी मागणी केली. या वेळी उपस्थित शेतकऱ्यांना डॉ. दिलीप नागवेकर यांनी नारळ लागवड, जोपासना, देखभाल, औषध, मात्रा, खत नियोजन याबाबत सविस्तर माहिती दिली. प्रारंभी प्रमोद कुरियन यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून नारळ विकास बोर्डाच्या योजनांची माहिती दिली. शेवटी शरद आगलावे यांनी आभार मानले. समारंभात आत्माचे अजित अडसूळ, तालुका कृषी अधिकारी प्रमोद सावंत, रूपेश राऊळ, अशोक दळवी, तसेच नारळ उत्पादक शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.