News Flash

हवाई वाहतूक करारातील गैरव्यवहार: ‘ईडी’च्या समन्सवर प्रफुल्ल पटेल म्हणतात..

गोंदिया येथील सभेत मोदींनी दीपक तलवारच्या अटकेवरुन प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधला होता. 

संग्रहित छायाचित्र

हवाई वाहतूक उद्योगातील करारातील आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांना अमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले असतानाच या घडामोडींवर प्रफुल्ल पटेल यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘ईडी’ला चौकशीत सहकार्य करण्यास तयार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळ्याप्रकरणी अटक झालेला दलाल दीपक तलवार याचा एअर इंडियातील आर्थिक गैरव्यवहारात सहभाग दावा अमलबजावणी संचालनालयाने केला आहे. नफ्यात असलेल्या मार्गावरील एअर इंडियाची विमान सेवा बंद करुन त्या खासगी विमान कंपन्यांना देण्यात आल्याचा आरोप असून यात दीपक तलवार हा प्रमुख आरोपींपैकी एक असल्याचे ईडीचे म्हणणे आहे. एप्रिलमध्ये न्यायालयात झालेल्या सुनावणीत ईडीने न्यायालयात दिलेली माहिती धक्कादायक होती. दीपक तलवार हा माजी नागरी हवाई वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांचा चांगला मित्र होता, असे देखील ‘ईडी’ने न्यायालयात म्हटले होते.

‘ईडी’ने शनिवारी प्रफुल्ल पटेल यांना समन्स बजावले असून त्यांना ६ जून रोजी सकाळी साडे अकरा वाजता कार्यालयात चौकशीसाठी बोलावले आहे.  या पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले,  ईडीला चौकशीत सहकार्य करण्यास तयार असून हवाई वाहतूक क्षेत्रातील गुंतागुंतीच्या प्रक्रियेबद्दल माहिती देऊ, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, गोंदिया येथील सभेत मोदींनी दीपक तलवारच्या अटकेवरुन प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधला होता.  “सध्या या भागातील राष्ट्रवादीच्या एका नेत्याला रात्रभर झोप येत नाही. त्याचे कारण तिहारमध्ये असलेला एक कैदी आहे. तो काय बोलणार, याकडे या नेत्याचे लक्ष लागले आहे. तो बोलायला लागला की सारे सत्य समोर येईल”, असा दावा मोदी यांनी केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2019 5:19 pm

Web Title: deepak talwar aviation deal case ed summons ncp leader praful patel reaction
Next Stories
1 डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण: संजीव पुनाळेकर यांचा लॅपटॉप जप्त
2 आमच्याशी चर्चा केल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनकरण करता येणार नाही-उदयनराजे
3 Street Food : स्वच्छतेच्या निकषांबाबत सरकार अपयशी ठरतंय असं वाटतं का?
Just Now!
X