News Flash

कधी सोफिया, कधी दीपाली अशी आहे शिवसेनेची प्रचार प्रणाली!

दीपाली सय्यद यांचा प्रचार करण्यासाठी अनोखा फंडा

दीपाली सय्यद या अभिनेत्रीने शिवसेनेत प्रवेश केला. दीपाली सय्यद मुंब्रा कळवा मतदार संघातून शिवसेनेच्या तिकिटावर लढत आहेत. राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड हेदेखील याच मतदारसंघातून लढत आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेनेने दीपाली सय्यद यांना उमेदवारी दिली आहे. दीपाली सय्यद यांचा प्रचार करण्यासाठी शिवसेनेने नवी प्रचार प्रणाली वापरली आहे. दीपाली सय्यद आणि सोफिया सय्यद या दोन्ही उपयोग प्रचारासाठी केला जातो आहे.

ठाण्यातील कळवा मुंब्रा मतदारसंघात जशी गरज आहे त्याप्रमाणे दीपाली सय्यद किंवा सोफिया सय्यद या दोन नावांचा वापर केला जातो आहे. जितेंद्र आव्हाड यांचं आव्हान लक्षात घेऊन शिवसेनेने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. दीपाली सय्यद यांना या मतदारसंघात उभं करुन शिवसेनेने वेगळी खेळी केली आहे. आता प्रचार करताना दीपाली सय्यद यांच्या दोन नावांचा खुबीने वापर करण्यात येतो आहे. मुस्लीम बहुल भागात प्रचार करताना सोफिया सय्यद आणि एरवी दीपाली सय्यद अशी दोन नावं वापरली जात असल्याची चर्चा आहे. दीपाली सय्यद यांचं लग्नापूर्वीचं नाव दीपाली भोसले असं होतं. त्यांचं लग्नानंतरचं नाव सोफिया सय्यद असं झालं. मात्र त्यांचं अधिकृत नाव दीपाली सय्यद असंच आहे. निवडणूक अर्जातही याच नावाची नोंद आहे. प्रचारात हे नाव वापरलं जात असल्याची माहिती शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने दिली आहे. प्रत्यक्षात मात्र दीपाली सय्यद आणि सोफिया सय्यद ही दोन्ही वापरुन मतं मागितली जात आहेत अशी चर्चा आहे. टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2019 4:47 pm

Web Title: deepali in one area sophia in another shivsenas new funda for election scj 81
Next Stories
1 नितेश राणे यांचे संघ ‘दक्ष’, विजयादशमीच्या उत्सवास हजेरी
2 काँग्रेस आणि राष्ट्रवादी थकलेत, भविष्यात एक होणार : सुशीलकुमार शिंदे
3 अमितभाई, पंकजाताई कलम ३७० चा महाराष्ट्रातील निवडणुकीशी संबंध काय?; सामान्यांचा सवाल
Just Now!
X