News Flash

दीपिका पादूकोणच्या वडिलांनी केली करोनावर मात; प्रकृती बिघडल्यानं रूग्णालयात केलं होतं दाखल

एक आठवड्यानंतर घरी परतणार

करोनाच्या दुसऱ्या लाटेत सामान्यांपासून ते अगदी बॉलिवूड सेलिब्रिटी पर्यंत अनेकांनी आपल्या माणसांना गमावलंय. यात बॉलवूड कलाकारांचाही समावेश आहे. परंतू काही बॉलिवूड कलाकार करोनाला हरवण्यात यशस्वी देखील झालेत. अशातच बॉलिवूडची ‘मस्तानी’ अभिनेत्री दीपिका पादूकोणसंदर्भात एक आनंदाची बातमी येत आहे. अभिनेत्री दीपिका पादूकोणचे वडील प्रकाश पादूकोण यांनी करोनावर यशस्वी मात केली आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री दीपिका पादूकोण हिच्या वडिलांसह आई उज्ज्वला पादूकोण, बहिण अनिशा पादूकोण या सगळ्यांना करोना झाला होता. त्यानंतर वडील प्रकाश पादूकोण यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता प्रकाश पादूकोण यांची प्रकृती स्थिरावली असून ते करोनातून बाहेर आल्याची माहिती त्यांचे जवळचे मित्र विमल कुमार यांनी दिली आहे.

यापूर्वी विमल कुमार यांनी प्रकाश पादूकोण करोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती देखील दिली होती. अभिनेत्री दीपिका पादूकोण हिच्या कुटूंबीयांना १० दिवसांपूर्वीच करोनाची लक्षण दिसून आले असल्याचं विमल कुमार यांनी सांगितलं. त्यानंतर सर्वांची करोना टेस्ट केल्यानंतर सगळे करोना पॉझिटिव्ह आल्याचं कळलं. अभिनेत्री दीपिका पादकोणचे वडील प्रकाश पादूकोण यांचा ताप उतरत नसल्यानं त्यांना बंगलोर इथल्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता करोनावर मात केल्यानंतर त्यांना आणखी एक आठवडाभर रूग्णालयात ठेवण्यात येणार असल्याचं देखील कळतंय.

दीपिका पादूकोणची आई उज्ज्वला पादूकोण आणि बहीण अनिशा पादूकोण हे सध्या घरीच क्वारंटाइनमध्ये आहेत. एक आठवड्यानंतर दीपिकाचे वडील सुद्धा रूग्णालयातून डिस्चार्ज घेऊन घरी परतणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 4:15 pm

Web Title: deepika padukone father prakash padukone discharged from hospital post covid 19 recovery prp 93
Next Stories
1 २ वर्षांपर्यंत पगार, मुलांसाठी शिक्षण, ५ वर्षांचा आरोग्यविमा… कोविड काळात बजाज ऑटोचा मोठा निर्णय!
2 “…अजिबात गरज नाही,” सोशल मीडियासाठी सहा कोटी खर्च करण्याचा निर्णय अजित पवारांकडून रद्द
3 करोना रोखताय की पसरवताय, रोहित पवारांची योगी सरकारवर टीका
Just Now!
X