महावितरणने नेमलेल्या कंत्राटदारांकडून सदोष मीटर गणन

नितीन बोंबाडे, डहाणू

महावितरणने शहरी आणि ग्रामीण भागातील विद्युत ग्राहकांसाठी नवीन डिजिटल मीटर बसवून दिली आहेत. मात्र या मीटरमध्ये तांत्रिक दोष असल्याचे उघड झाले आहे. सदोष मीटरमुळे वीजदेयकांवर तिपटीने गणन छापले जात आहे. याचा मोठा आर्थिक फटका ग्राहकांना सोसावा लागत आहे.

महावितरणने घरगुती वीज वापराच्या दरांत वाढ केली आहे. अधिकचे गणन आणि  वाढीव दर अशा दुहेरी माऱ्यामुळे  ग्राहकांच्या खिशावर ताण येत आहे.

सायवन, किन्हवली, दाभाडी दिवशी, सायवन, चळणी, कासा आणि चारोटी या भागात सदोष आणि चुकीचे गणन यामुळे तिप्पट दराने देयके येत आहेत.

वाढीव वीजदेयके न भरल्याने  थकबाकी दाखवून वीज कर्मचारी वीज जोडणी तोडण्यासाठी येत असल्याने वीज कर्मचार्याना  ग्राहकांच्या मनस्तापात भर पडली आहे.

सुकट आंबा येथील बाळू चौधरी याच्या झोपडय़ाला दरमहा ३०० ते ३५० रुपयांच्या आसपास येणारे विज बील थेट २५ हजार आले आहे. तर सदु ठाकरे या अपंग व्यक्तीच्या झोपडय़ातील एकमेव दिव्यासाठी चार हजार रुपयांची रक्कम आकारली गेली आहे.

ग्राहकांनी देयकाची रक्कम न भरल्याने महावितरणने मीटर काढून नेले आहे. त्यामुळे ग्राहकांना अंधारात राहावे लागत आहे.

कासा बाजारपेठेत अनेक ग्राहकांना तीन महीन्यापासुन वीज देयकाचे अनियमित वितरण होत असल्याने  ग्राहक त्रस्त झाले आहेत. नियमित विज बील येत नसल्याने वीज ग्राहक वेळेत वीज बील भरु शकत नाहीत .तर अचानक दोन , तीन महिन्यांआड मोठय़ा रकमेची  थकबाकी हातात पडत असल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे.

महावितरणचा भोंगळ कारभार, कंत्राटदाराची मनमानी, त्याच्यावर अधिकारम्य़ांचे नसलेले नियंत्रण, विद्य्ुत वापरापेक्षा कितीतरी अधिक वीज बिल यामुळे वाढती बिले आलेल्या शहरी व ग्रामीण भागातील हजारो ग्राहकांनी त्याचा जाब विचारण्यासाठी व ते दुरुस्त करण्यासाठी दरमहा वीज महावितरण कार्यालयाला गर्दी पहायला मिळत आहे.  महावितरणच्या डहाणू परिमंडळ, विभाग व उपविभागीय कार्यालयाने विद्य्ुत बिलांचे गणन घेणाऱ्या आणि देयके देणाऱ्या कंत्राटदार अधिकार्यांचे नियंत्रण नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.

वीज वितरण गणनाचे काम एजन्सीला दिले आहे. मागे काही तरुणांनी काम सोडले होते. त्यामुळे वीज या तक्रारी आल्या असतिल .पण आता अनेक ठिकाणी नवीन मुले घेतली गेली आहेत. तीन महिने चार महिन्यांची थकबाकी असल्याने वीज जोडणी तोडण्यात आली असेल.

-बी. एस. धोडी, उपअभियंता महावितरण