News Flash

कृषी विद्यापीठाच्या मागणीला स्वाक्षरी मोहिमेने कराडकरांचा पाठिंबा

साताऱ्यात कृषी विद्यापीठाची गरज ओळखून खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केलेल्या मागणीस मोठा पाठिंबा लाभत असून, कराड येथे राजेसमर्थक कार्यकर्त्यांनी राबवलेल्या स्वाक्षरी

| June 21, 2014 01:43 am

कृषी विद्यापीठाच्या मागणीला स्वाक्षरी मोहिमेने कराडकरांचा पाठिंबा

साताऱ्यात कृषी विद्यापीठाची गरज ओळखून खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केलेल्या मागणीस मोठा पाठिंबा लाभत असून, कराड येथे राजेसमर्थक कार्यकर्त्यांनी राबवलेल्या स्वाक्षरी मोहिमेलाही चांगला प्रतिसाद मिळाला.
उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव मित्र मंडळातर्फे उदयनराजे यांच्या मागणीला पाठिंबा दर्शविण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. कराड तहसील कचेरीसमोर दिवसभर स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. त्यात हजारो नागरिकांनी स्वाक्षरी करून उदयनराजेंच्या मागणीला पाठिंबा दर्शविला. यावेळी पारधी मुक्ती आंदोलनाचे अध्यक्ष प्रकाश वायदंडे, नगरसेवक हणमंत पवार, प्रमोदसिंह कदम, विजय यादव, आनंद देसाई, जयंत गुजर, संजयसिंह राजेभोसले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, साताऱ्यासह जावली, मेढा, पाटण, खटाव, वडूज, फलटण, कोरेगाव, रहिमतपूर येथूनही कृषी विद्यापीठाच्या मागणीला जोरदार पाठिंबा मिळाला आहे. कृषी विद्यापीठासाठी उदयनराजे कमालीचे आक्रमक असल्याने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आघाडी शासन काय निर्णय घेते याकडे सर्वाच्या नजरा लागून आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2014 1:43 am

Web Title: demand of agricultural university by karad citizen 2
Next Stories
1 पाऊस रखडला तर लातूरकरांना महिन्यातून एकदाच पाणी
2 पाऊस रखडला तर लातूरकरांना महिन्यातून एकदाच पाणी
3 परभणी जिल्ह्यात मृग बरसला पेरणीसाठी हवा दमदार पाऊस
Just Now!
X