News Flash

कोळसे पाटील तसेच मुश्रीफ यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी

निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील व निवृत्त पोलीस महानिरीक्षक एस. एम.मुश्रीफ यांना पोलीस संरक्षण मिळावे या मागणीचे निवेदन अखिल भारतीय नौजवान सभेच्या वतीने विशेष

| March 18, 2015 03:50 am

निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील व निवृत्त पोलीस महानिरीक्षक एस. एम.मुश्रीफ यांना पोलीस संरक्षण मिळावे या मागणीचे निवेदन अखिल भारतीय नौजवान सभेच्या वतीने विशेष पोलीस महानिरीक्षक रीतेशकुमार यांना देण्यात आले. पोलीस संरक्षण न दिल्यास ए. आय. एस. एफ व ए. आय. वाय. एफ.चे रेड गार्ड्स आपले शिक्षण व रोजगार सोडून कोळसे पाटील व मुश्रीफ यांना संरक्षण देतील असा इशाराही या वेळी संघटनेच्या वतीने देण्यात आला.
कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे ३० डिसेंबर रोजी ‘हू किल्ड करकरे’ या कार्यक्रमाचे आयोजन ज्येष्ठ नेते गोिवद पानसरे यांनी केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी. जी. कोळसे पाटील होते, तर एस. एम. मुश्रीफ लिखित पुस्तकावर या वेळी चर्चा होणार होती. यानंतर दीड महिन्यातच गोिवद पानसरे यांचा खून करण्यात आला. यामुळे मुश्रीफ व बी. जी. कोळसे पाटील यांच्याही जीवितास धोका होऊ शकतो त्यामुळे त्यांनाही पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2015 3:50 am

Web Title: demand of police protection to mushrif and kolse patil
टॅग : Demand,Kolhapur
Next Stories
1 माजी मंत्री थोरात यांचे एकहाती वर्चस्व
2 भंडारदारा रस्त्यासाठी धरणाचे चाक बंद करण्याचा इशारा
3 राज्याचे आर्थिक चित्र निराशाजनक; आर्थिक पाहणी अहवालाचा निष्कर्ष
Just Now!
X