News Flash

पत्नी हेमाचा जामीन नाकारला

शहराच्या गंजबाजार भागातील मोहन ट्रंक डेपोचे मालक व तरुण व्यापारी जितेंद्र मोहनलाल भाटिया यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार, त्यांची पत्नी दिव्या ऊर्फ हेमा भाटिया (वय

| July 26, 2014 04:11 am

शहराच्या गंजबाजार भागातील मोहन ट्रंक डेपोचे मालक व तरुण व्यापारी जितेंद्र मोहनलाल भाटिया यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार, त्यांची पत्नी दिव्या ऊर्फ हेमा भाटिया (वय ३२) हिचा जामीनअर्ज न्यायालयाने फेटाळला. तदर्थ सत्र न्यायाधीश ए. एन. चौरे यांनी हा आदेश शुक्रवारी दिला.
गंजबाजारातील दुकानात जितेंद्र भाटिया यांचा २७ मेच्या रात्री नऊच्या सुमारास गोळ्या घालून खून करण्यात आला होता. हेमा हिचे प्रदीप उर्फ पप्पू जनार्दन कोकाटे याच्याशी अनैतिक संबंध होते, त्यातूनच हेमा याने कोकाटेला पैसे देऊन जितेंद्रचा खून करण्याची सुपारी दिल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले होते. पप्पू याने गुन्ह्य़ात वापरलेला गावठी कट्टा विक्रम ऊर्फ गोटय़ा किशोर बेरड याच्याकडून मिळवला होता.
हेमा हिने जामीनअर्ज सत्र न्यायालयात दाखल केला होता. ती गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्य़ातील मुख्य सूत्रधार असल्याचा युक्तिवाद करत अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील पुष्पा गायके-कापसे यांनी जामीनअर्जास विरोध केला. तो न्यायालयाने मान्य केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2014 4:11 am

Web Title: denied bail of hema bhatiya
Next Stories
1 गुन्ह्याशी संबंधित वैद्यकीय कागदपत्रे पोलिसांनी आठवडय़ात ताब्यात घ्यावीत
2 खा. गांधी यांच्यासह अर्बन बँकेच्या आजी-माजी ५६ संचालकांना नोटिसा
3 दलित वस्ती आराखडय़ास स्थगिती
Just Now!
X