18 February 2020

News Flash

बालकांवर अत्याचाराची चित्रफीत; दोघांवर गुन्हा

मुंबई येथील सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांनुसार ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

(संग्रहित छायाचित्र)

बालकांवर अत्याचाराची चित्रफीत; दोघांवर गुन्हा

बीड : लहान मुलांच्या दोन अश्लील चित्रफीत तयार करून त्या समाजमाध्यमातून प्रसारित केल्याचा प्रकार परळी व गेवराईत उघडकीस आला आहे. या प्रकरणात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सांगितले.

पोलिसांच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच त्यांना ताब्यात घेणार असल्याचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सांगितले. दोन्ही पीडित मुले जिल्ह्यबाहेरील असून गेवराई आणि परळी पोलीस ठाणे हद्दीत या चित्रफीत प्रसारित झाल्या आहेत.

मुंबई येथील सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांनुसार ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, २६७ गुन्ह्यंमध्ये चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून जिल्ह्यत ३ हजार ९९६ प्रतिबंधात्मक कारवाया केल्या. २८ गंभीर गुन्ह्यंचा तपास लावण्यातही पोलिसांना यश आल्याचे पोद्दार यांनी सांगितले.

राज्यभरातून बाल लैंगिक अत्याचाराशी संबंधित २७ चित्रफितींवर मुंबईतील विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालयांतर्गत सायबर सेलकडून कारवाई करण्यात येणार आहे. २७ पकी दोन चित्रफिती बीड जिल्ह्यतून समाज माध्यमावर आल्या आहेत.

First Published on January 16, 2020 2:21 am

Web Title: depiction abuse children two arrest akp 94
Next Stories
1 कार अपघातात दोन ठार; तीन जण जखमी
2 अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या
3 अमरावतीत बनावट नोटांचा गोरखधंदा उघड, दोघांना अटक
Just Now!
X