26 February 2021

News Flash

करोनाविरुद्घचा लढा लवकर संपवायचा असेल तर… अजित पवार म्हणतात…

दिवे लावायला सांगितल्यानंतर झुंडीनं रस्त्यावर उतरणं हा बेजबाबदारपणाचा कळस असल्याचं ते म्हणाले

करोनाविरुद्धच्या लढ्यातील महत्वाचा, निर्णायक टप्पा सुरु झाला असून ज्या नागरिकांमध्ये करोनाची लक्षणे आहेत किंवा इतिहास करोनाच्यादृष्टीने संशयित आहे त्यांनी आतातरी लपून न राहता आरोग्य यंत्रणांशी त्ताकाळ संपर्क साधावा. करोनाविरुद्धचा लढा लवकर संपला पाहिजे, त्यासाठी संशयितांनी पुढं यावं. अन्य नागरिकांनी घरातच थांबून सहकार्य करावं, संशयित व्यक्तींची माहिती शासकीय यंत्रणेला त्वरीत कळवावी, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

राज्यात करोना रुग्णांची संख्या दररोज शेकडोंनी वाढत आहे. मृत्यूंची संख्याही वाढत आहे. तरीही परिस्थितीचं गांभीर्य काही जणांच्या लक्षात येत नाही, हे दुर्दैवं आहे. पंतप्रधानांनी दारात, खिडकीत दिवे लावायला सांगितले असतानाही, मशाली पेटवून लहान मुलं, महिलांना सोबत घेऊन झुंडीनं रस्त्यावर उतरणं, फटाके वाजवून आगीला कारणीभूत ठरणं, हा बेजबाबदारपणाचा कळस आहे. यापुढे तरी सर्वांनी जबाबदारीनं वागलं पाहिजे, असं पवार म्हणाले.

आणखी वाचा- औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातल्या परिचारकाला करोनाची लागण

डॉक्टर, पोलिसांमध्ये संसर्ग दिसणं चिंताजनक
राज्यातील डॉक्टर, नर्सेस, पोलीस, सफाई कर्मचारी अशा कोरोनाविरुद्धच्या यंत्रणेतील घटकांमध्ये कोरोनाचा संसर्ग दिसू लागला आहे. हे चिंताजनक आहे. हा प्रसार थांबवायचा असेल तर कोरोनाची साखळी तोडणं आणि त्यासाठी सर्व नागरिकांनी घरात थांबणं, संशयित व्यक्तींनी तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल होणं हाच प्रभावी मार्ग असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आणखी वाचा- “अंधश्रद्धेच्या मागे जाऊ नका, ज्ञानाचा दिवा लावा”, शरद पवारांचं आवाहन

अडचणीवर मात करू
टाळेबंदीमुळे देशाची, राज्याची अर्थव्यवस्था अडचणीत आली असली तरी त्यावर नंतरच्या काळात मात करता येईल, परंतु आता कोरोनाचा लढा हा एकजुटीनंच लढला पाहिजे. ही लढाई सर्वांची आहे. सर्वपक्षीय, सर्वधर्मीय नागरिक या लढ्यात एकजुटीनं उतरले आहेत ही बाब बळ देणारी आहे. राज्यातल्या, देशातल्या जनतेची एकजूट व कोरोनाविरुद्ध लढण्याचा निर्धारच आपल्याला या लढाईत यश मिळवून देईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2020 2:38 pm

Web Title: deputy cm ajit pawar appeals coronavirus symptoms patients to come forward we will come out of it soon jud 87
Next Stories
1 बीडमध्ये क्षीरसागर काकाचा पुतण्याला टोला, करोनामुळे पुन्हा वातावरण तापण्याची शक्यता
2 आव्हाडांनी जोडली मोदींच्या दिव्यांची जनसंघाच्या पणतीशी नाळ
3 Coronavirus : महिला बचतगटांनी केला १५ हजार मास्कचा पुरवठा
Just Now!
X