07 April 2020

News Flash

सांगलीत पोलीस उपअधीक्षकाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

त्यांची नुकतीच पदोन्नतीवर बदली झाली होती.

सांगली येथे एका पोलीस उपअधीक्षकाने राहत्या घरी सर्व्हिस रिव्हॉल्वरने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली.

सांगली येथे एका पोलीस उपअधीक्षकाने राहत्या घरी सर्व्हिस रिव्हॉल्वरने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली. सखाहरी गिरजप्पा गडदे असे आत्महत्या केलेल्या पोलीस उपअधीक्षकाचे नाव असून सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांनी आत्महत्या केली. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

सखाहरी गडदे यांची नुकतीच राज्य गुप्तचर विभागात पोलीस उपअधीक्षक म्हणून पदोन्नतीवर बदली झाली होती. यापूर्वी ते तुरची येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत होते. मनासारखी पोस्टिंग न मिळाल्यामुळे आलेल्या नैराश्येतून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते. गडदे यांच्यामागे पत्नी आणि दोन मुले आहेत. विश्रामबाग परिसरात ते कुटुंबीयांसोबत राहत होते. सकाळी साडेसातच्या सुमारास घरातील एका खोलीत त्यांनी सर्व्हिस रिव्हॉल्वरने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. गडदे यांचा मृतदेह शवविच्छेनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2017 11:45 am

Web Title: deputy superintendent of police suicide in sangli
Next Stories
1 मोडीतील शुभेच्छापत्रे!
2 शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी मध्य प्रदेशचा अनोखा उपक्रम
3 पश्चिम विदर्भात पीक कर्जवाटपाचा नीचांक!
Just Now!
X