डेरा सच्चाचा आश्रम आजही कार्यरत

स्थानिकांमधून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही म्हणून डेरा सच्चा पंथाचा प्रमुख गुरुमीत राम रहिम याचा आटपाडीजवळ आश्रम स्थापन करण्याचा डाव १० वर्षांपूर्वी अयशस्वी ठरला. येथील ६५ एकर जागेत बांधण्यात आलेली एखाद्या गुहेसारखी इमारत पाडण्यात आली तरी सध्या उ़र्वरित ११ गुंठय़ांत सध्या सच्चा डेराचा आश्रमही आजही कार्यरत आहे.

डेरा सच्चा पंथाचा प्रमुख गुरुमीत राम रहिम याचे आटपाडीशी असलेले संबंध चच्रेत आले असून सध्या या पंथाचा आश्रम आजही दर रविवारी सत्संगाच्या निमित्ताने वर्दळीत असल्याने चच्रेचा विषय बनला आहे. बाबा राम रहिम याने आपल्या पंथाचा विस्तार करण्यासाठी महाराष्ट्रात २० वर्षांपूर्वी आटपाडीत प्रवेश केला होता. आटपाडीपासून आठ किलोमीटर दिघंची रोडवर चरेवाडी या गावच्या हद्दीत ६५ एकर जमीन खरेदी केली होती. या ठिकाणी गुहाही तयार करण्यात आली होती. वर्षांतून एक वेळ राम रहिम या ठिकाणी येत होता. १० वष्रे या ठिकाणी आपल्या पंथाचे प्रस्थ वाढविण्याचा प्रयत्न केला. मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात येताच १० वर्षांपूर्वी ही सर्व मिळकत विकण्यात आली

या आश्रमात द्राक्ष आणि डाळिंब यांची लागवड करण्यात आली होती. पाण्यासाठी विहीर खुदाई करण्यात आली होती. दर वर्षी या ठिकाणी राम रहिमचे भक्त आलिशान वाहने घेऊन माळावर सत्संगासाठी जमत होते. मात्र भाविकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे या आश्रमाचे स्थलांतर फलटणजवळ करण्यात आले.

आश्रमाची जमीन विकत असताना आश्रमासाठी ११ गुंठे जागा ठेवण्यात आली. याच ठिकाणी सध्या सिमेंट पत्र्याचे छप्पर असणारी इमारत असून दर रविवारी सत्संगाचा कार्यक्रम घेण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. मात्र यासाठी उपस्थित भक्तांची संख्याही शेकडय़ाच्या प्रमाणात आहे. या भक्तांना दर वर्षी सत्संगासाठी हरियाणातील सिरसा येथील आश्रमात नेण्यात येते.   राम रहिमने अभिनय केलेले चित्रपटही आटपाडीच्या चित्रपटगृहात प्रदíशत करण्यात आले होते. स्थानिक लोकांना राम रहिमबद्दल माहिती व्हावी यासाठी चित्रपट दाखविण्यात येत होते.