सोलापूर विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या एम. ई. परीक्षेत सोलापुरातील सोरेगावच्या ए. जी. पाटील इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीची विद्यार्थिनी देवांशी अक्षय जव्हेरी हिने ७८.६२ टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावला.
देवांशी जव्हेरी यांनी यापूर्वी गुजरात विद्यापीठातून बी. ई. (मेकॅनिकल) परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली होती. त्या एस. ई. एस. पॉलिटेक्निक संस्थेत प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. एम. ई. परीक्षेत विद्यापीठात प्रथम आल्याबद्दल त्यांचे संस्थेचे सचिव एस. ए. पाटील, एस. ई. एस. पॉलिटेक्निकचे प्राचार्य एन. डी.कुलकर्णी यांनी अभिनंदन केले. ए. जी. पाटील इन्स्टिटय़ूटचे प्राचार्य डॉ. एस. ए. पाटील, उपप्राचार्य विश्वजित पोतदार, विभागप्रमुख प्रा.दुलंगे, समन्वयक प्रा.आर. एम. पाटील यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.