रावसाहेब पुजारी

गेल्या ७५ वर्षातील स्वतंत्र भारतातील शेती व्यवसायाकडे पाहिल्यास खूप बदल झालेले दिसतात. देशातील बहुसंख्य जनतेचा हा एक प्रमुख व्यवसाय आहे. आजही ६० टक्क्याहून अधिक लोकांची रोजी-रोटी याच व्यवसायाशी निगडित आहे. रोजगाराच्या सर्वाधिक संधी याच व्यवसायामध्ये सामावलेल्या आहेत. बेरोजगारी आणि छुपी-रोजगारी या दोन्हींना या व्यवसायाने सामावून घेतलेले आहे. पारंपरिकतेपासून आजच्या ‘हायटेक’ तंत्रज्ञानाचा आविष्कार या व्यवसायाने अंगीकारलेला दिसतो.

upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
lancet study on breast cancer how early diagnosis and understanding relapse can help women
भारतात दर चार मिनिटांनी एका महिलेला स्तनाच्या कर्करोगाचे निदान; महिलांकडे दुर्लक्ष होतंय का? वाचा तज्ज्ञांचं निरीक्षण
North Mumbai Lok Sabha Constituency Degradation of environment and pollution due to development activities
आमचा प्रश्न – उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ : विकासकामांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, प्रदूषणाचा विळखा
mpsc mantra environment question analysis career
mpsc मंत्र: पर्यावरण प्रश्न विश्लेषण

परिवर्तन हा काळाचा नियम आहे आणि त्याला शेती अपवाद राहिलेली नाही. शेतीमध्ये आजवर हरितक्रांती, नीलक्रांती, श्वेतक्रांती असे विविध टप्पे घडून आले आहेत. यामुळे एकीकडे अन्नधान्याची ददात असणारा देश निर्यातदार म्हणून लौकिक मिळवण्यापर्यंत अग्रस्थानी आला आहे. याचवेळी काही आव्हानात्मक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. शेतीतील मध्यवर्ती असलेला शेतकरी हा घटक अजूनही विकासापासून कोसो दूर राहिलेला आहे. त्याच्याहीपुढे जाऊन सांगायचे झाले तर शेतीच्या शाश्वतेच्या मूलभूत परिवर्तनाकडे दुर्लक्ष झालेले दिसते. आपल्याला उपलब्ध संसाधनांचा शास्त्रीय वापर करण्यात आपण कमी पडलो, जमिनीतून सतत पाणी उपसत असताना तिच्या पुनर्भरणाचा विचार फारसा झाला नाही. याचे दीर्घकालीन परिणाम आज शेतीला फार मोठ्या प्रमाणात भेडसावताना दिसतात. शेतीतील हे एकारलेपण शेतकऱ्यांच्या अज्ञानातून आलेले आहे, नियोजनकत्र्यांच्या आकलन दारिद्र्यामुळे आलेले आहे, शासनाच्या शेतीविषयक शाश्वत धोरणाअभावाने आलेले आहे. राजकीय मतपेटीच्या रक्षणासाठी एकाचा बळी देऊ न, दुसऱ्याचे रक्षण करण्याच्या राजकीय धोरणातील शेतीविषयक तुष्टपणाच्या विचाराचा परिपाक आहे. आणि शेतकऱ्यांच्या देशव्यापी व्यापक दबावाच्या अभावाचासुद्धा हा परिणाम आहे, असे म्हणावे लागेल. हे असले तरी शेतीची फुललेली हिरवाई आजही माणसाला उभारी देणारी आहे.

फार मागे न जाता स्वातंत्र्यपूर्व आणि उत्तर याचा थोडा विचार केला तरी हे लक्षात येते. इंग्रज सत्तेच्या काळात जवळपास ११ मोठे दुष्काळ आल्याने देशवासीयांना भुकेच्या संकटाला तोंड द्यावे लागले.तेव्हा धान्यनिर्मिती व धान्यवितरण या बाबतीतील सरकारच्या चुकीच्या व बेपर्वाईच्या धोरणांमुळे लाखो लोक मृत्यमुखी पडले. बंगाल, बिहार येथील दुष्काळ काळातील सामान्य जनतेचे हाल अंगावर काटे आणणारे आहेत. आपल्याला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशाची लोकसंख्या मर्यादित होती. उपलब्ध साधन-संपत्तीतून त्या लोकसंख्येला पुरेल एवढे धान्य सहज उपलब्ध करून देण्यास भारतातील शेती सक्षम होती. पुढे लोकसंख्या वाढली, पण शेतीचे क्षेत्रफळ वाढले नाही. वाढत्या तोंडांना पुरेसे धान्य कमी पडू लागले. देशाला अन्य देशातून धान्य आयात करण्याची वेळ आली आणि पहिल्या हरितक्रांतीची हाक दिली गेली. सुधारित बियाणे, रासायनिक खते, नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचवले गेले. एक नवी ऊ र्जा शेतकऱ्यांत निर्माण केली गेली. १९६० च्या दशकात देशात हरितक्रांती यशस्वी झाली. धान्य, तांदूळ, गहू यांचे विक्रमी उत्पादन देशात तयार झाले. देश धान्य उत्पादनात स्वयंपूर्ण झाला. १९५० च्या दरम्यान ५.२ कोटी टनांच्या आसपास असलेले धान्योत्पादन २०१३ मध्ये २६.३ कोटी टनांवर पोचले. तेव्हा देशातील धान्य गोदामांमधील राखीव अन्नसाठा ६ कोटी टनांच्या वर गेला. भारतातील संकरित वाणांच्या बियाणांची उलाढाल अंदाजे २० हजार कोटी रुपयांच्या आसपास आहे. डाळी आणि तेलवर्गीय बियांचा अपवाद वगळता आज १.४० अब्ज लोकसंख्येला पुरेल इतके अन्नधान्य आपल्या देशात पिकते.

आपले धोरण उत्पादकता वाढीकडे झुकले. पण त्याचवेळी शेतकऱ्यांची शास्त्रीय मानसिकता बनविणे, उपलब्ध संसाधनांचा नीट वापर, शेतीचा इको-बॅलन्स सांभाळणे, शेतीतील सेंद्रिय कर्बाचे नियोजन करणे, जमितीच्या पोताचे शाश्वतीकरण आपण विसरलो. यातून भलत्याच समस्या पुढे आलेल्या दिसतात. आणि त्याच्या निराकरणासाठी फार मोठी शक्ती खर्च केली जाते आहे. उदा. अति रासायनिक खते, अति पाण्याच्या वापराने तसेच वर्षानुवर्षे उसासारखे एका शेतात एकच पीक घेतले गेले. याचा परिणाम आज हजारो एकर क्षेत्र क्षारपीडित झालेले आहे. ते नापीक बनल्याने त्यातून साधे गवताचे पातेही उगवत नाही. अशा जमिनी पुन्हा लागवडीखाली आणण्यासाठी कोट्यवधीचा निधी खर्ची घातला जात आहे. तसेच जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी झाल्याने जमिनीची उत्पादकता कमी झालेली आहे, तो सेंद्रिय कर्ब कमी होण्यामध्ये शेतकऱ्यांमधील शास्त्रीय दृष्टीकोनाचा अभाव, बदलती पीक-पद्धती, जमिनीला विश्रांती न देणे आणि पद्धतशीरपणे सेंद्रिय कर्ब निर्मिती न करणे अशा अनेक घटकांचा समावेश आहे. हा सेंद्रिय कर्ब अंशा-अंशाने, अत्यल्प टक्क्याने वाढवितानासुद्धा शेतकऱ्यांची दमछाक होताना दिसते.

जमीन शाश्वत ठेवावयाची असते हा विचारच अनेक शेतकऱ्यांना शिवताना दिसत नाही. त्यासाठी तिच्या अंतरंगातील हवा, पाणी सतत खेळती ठेवणे, तिच्यातील मातीच्या कणांमधील जिवाणू जिवंत राहतील, याची काळजी घेणे, जिवाणूंची जैव-साखळी अबाधित राहील, असा ‘इको-बॅलन्स’ सांभाळणे फार महत्त्वाचे आहे. तिच्या पुनर्भरणासाठी ध्यास घेणे, त्यासाठी ‘इको-फ्रेंडली’ पीक पद्धती राबविणे या गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात. याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे लागेल, तसे नियोजन करावे लागेल.

एका बाजूने शेतजमिनीवरील अतिक्रमणे फार मोठ्या संख्येने वाढत आहेत. शेती क्षेत्रात आक्रसलेपण आलेले आहे. त्यावर व्यापारी उद्दिष्टांची छाया पसरलेली आहे. शहरीकरण आणि खेड्यातील शहरीकरणाशी मिळते-जुळते बदलते जीवन प्रवाहाने शेतीवर वाढते आघात वाढलेले आहेत. पर्याय नाही म्हणून शेतीत जीवन कंठणारे ९० टक्के लोक शेतीतील पारंपरिकता सोडायला तयार नाहीत. त्यांना परिवर्तनासाठीचे बळ उपलब्ध नाही. आणि जे येईल ते आपले ही मानसिकता त्यांना पुन्हा त्यातच ढकलते आहे. शेतकऱ्यांच्या पोरांनासुद्धा पुन्हा शेतीत यावे, नवीन काही करून दाखवावे, असे वाटनासे झालेले आहे. आजच्या शिक्षण पद्धतीने त्यांना धड  शेतीतील काही येते, ना बाहेरच्या जगाच्या वाटा त्यांच्यासाठी मोकळ्या झालेल्या आहेत. यामुळे शेतीच्या मूलभूत परिवर्तनाकडे सतत दुर्लक्ष होत आहे, हे आजच्या शेतीचे खरे वास्तव आहे. याला पुरून उरेल, शेतकऱ्यांच्या प्रबोधनातून नवं जग उभारता येईल. हे सगळे कुंठीतपण शेतीचे नुकसान करीत आहे. शेतकरी संघटनांना फुटीचा शाप लागलेला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांऐवजी एकमेकांचे कपडे मात्र पद्धतशीरपणे फाडताहेत; हेही त्रासदायक.

एका बाजूला भारतीय शेतीविश्वचे हे विदारक चित्र समोर येत असताना शेतीत सगळेच काही निराशाजनक नाही, हे सुद्धा नमूद केले पाहिजे. आपला शेतकरी जिगरबाज आहे. फक्त त्याच्या पाठीवर हात ठेवून लढ म्हणण्याची गरज आहे. नवतरुणाईची शेतीतील पावलं खूप काही करताना दिसू लागलेली आहेत.

आजच्या शेतीचा विचार करताना जिरायत शेती आणि बागायती शेती असा फरक केला पाहिजे. जिरायत, कोरडवाहू आणि खास करून पावसावर असणारी अशी सहामाही, आठमाही राहिलेली शेती फार मोठ्या क्षेत्रात पसरलेली आहे. तिच्यातून ज्वारी, बाजरी, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल, इतर धान्ये, कडधान्ये आणि तांदळासारखी पिके घेतली जातात. शेतीतील हा फार मोठा वर्ग आहे. त्याला स्वत:चा असा आवाज राहिलेला नाही. त्याला बाजारपेठेचा सपोर्ट नाही. हा वर्ग केवळ पोट भरण्यासाठी शेती करतो. फारशा कृषी निविष्ठांचा वापर केला जात नाही. घरचे मनुष्यबळ शेतीत राबते, दुग्ध व्यवसाय, शेळी पालन, मेंढीपालन, कोंबडीपालनसारख्या व्यवसायाच्या साथीने हा वर्ग शेतकरी म्हणून स्वत:ला घेण्यात धन्यता मानतो आहे. यांच्यासाठी शासन काही करते आहे, असे दिसत नाही. कृषी विद्यापीठांच्या अजेंड्यावर यांचे संशोधन आलेले नाही. या ‘नाही रे’ वर्गाचा आवाजच त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही.

दुसऱा वर्ग बागायती शेतकऱ्यांचा आहे. तो नगदी पिकांकडे वळलेला आहे. ऊ स, फळबागांपैकी द्राक्ष, डाळिंब, संत्री, मोसंबी, केळी तसेच भाजीपाला उत्पादने घेतो आहे. याशिवाय नावीन्यपूर्ण उत्पादनाकडे त्यांचा ओढा आहे. यामध्ये हरितगृहातील फुलशेती, विलायती भाजीपाला उत्पादने, ड्रॅगन फ्रुटसारखी उत्पादने, सेंद्रिय भाजीपाला यासारख्या उत्पादनातून पैसा कमावतो आहे. त्यांच्या विविध संघटना, संशोधन संस्था आहेत. त्यांच्या माध्यमातून त्यांचे आवाज शासनकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था आहे. यांच्या नुकसानाची, यांच्या अडचणींची, समस्यांची शासनकर्ते, राज्यकर्ते दखल घेतात. त्यांना मार्ग काढून दिला जातो.

महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, तामिळनाडू या राज्यात ऊ स घेतला जातो. ऊस शेतीत सुद्धा अनेक परिवर्तने आलेली आहेत. लागवड पद्धतीत अनेक बदल झालेले आहेत. मात्र, त्याची व्यापकता तळापर्यंत अधिक परिणामकारकपणे राबविली जात नाही. त्यामुळे एका बाजूला दीडशे-दोनशे टन एकरी उत्पादन घेणारे शेतकरी आहेत, त्याचवेळी राज्याची ऊ स उत्पादकता कितीही प्रयत्न करून एकरी २५ टनाच्यापुढे जाताना दिसत नाही. जे पथदर्शक आहे, ते प्रभावीपणे लोकांच्यापुढे ठेवण्याची यंत्रणा अधिक सक्रिय होण्याची, कृषि निविष्ठांचा वापर नीटनेटका होण्याची नितांत गरज आहे.

नगदी पिकांकडील ओढा

द्राक्ष, डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांमध्ये जी जागृती आहे, ती इतर अन्य उत्पादकांमध्ये अभावाने दिसते. ही पिके हवामान बदलाला अतिशय संवेदनशील राहिलेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सतत जागरूक राहावेच लागते. केळीसारख्या पिकातसुद्धा अनेक परिवर्तने आलेली आहेत. टिश्युकल्चर रोपांमुळे हमखास उत्पादन आणि निर्यातक्षम उत्पादन मिळू लागले आहे. शेतकऱ्यांच्या गट शेतीच्या संकल्पनेमुळे शेतीमालाच्या बाजारपेठा सहजपणे शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ  लागल्या आहेत. बाजार समिती, व्यापारी, दलाल यांच्या कचाट्यातून शेतकऱ्यांना संरक्षण मिळालेले आहे. मात्र, शेतकरी फसवणुकीचे वेगळे फंडे हीच मंडळी बऱ्याचदा वापरत असताना दिसतात. यावर उपाय योजनांची गरज या शेतकऱ्यांना भासते आहे.

शेतीपूरक व्यवसायांना बरकत

शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अनेक पर्याय पुढे आलेले आहेत. यापैकी पशुपालन हा पूर्वापार चालत आलेला आहे. यामध्येही आता अनेक बदल झालेले आहेत. पशुपालन पूर्वीसारखे राहिलेले नाही. त्यात व्यापारी दृष्टीकोन खूप आलेला आहे. दुग्ध व्यवसायाचे स्वरूप बदललेले आहे. या व्यवसायाने गेल्या काही वर्षात श्वेतक्रांती घडविलेली पाहायला मिळते. एक गाय दिवसाला ४०-४५ लिटरपर्यंत दूध देऊ  लागलेली आहे. म्हशीच्या दुधापासून अनेक उपपदार्थांची निर्मिती केली जाऊ  लागलेली आहे. दुग्ध व्यवसायामुळे शेतकऱ्यांना चांगले आर्थिक स्थैर्य प्राप्त झालेले आहे. शेळी पालनासारख्या व्यवसायातील बदल लक्षवेधी आहेत. एका बाजूला मटणाचे दर गगनाला भिडलेले आहेत, त्याची मागणी सतत वाढते आहे. ही गरज भागविण्याची ताकद या व्यवसायात आहे. अनेक होतकरू तरुण यासाठी पुढे येताना दिसतात. अनेक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम केलेली ही मंडळी या व्यवसायात स्वत:ला गुंतवून घेताना दिसतात. तरंगत्या पाण्यावर मत्स्यसंवर्धित शेतीचे प्रयोगसुद्धा याच मुशीतून गावोगावी होऊ  लागलेले आहेत.

नव्या वाटा धुंडाळताना

नवे प्रयोग, नव्या वाटा उमेदीने जोपासल्या, जागवल्या जात आहेत. यातूनच रोपवाटिकेला अच्छे दिन येताना दिसतात. जनुकीय अभियांत्रिकीकडे आशेने पहिले जात आहे. ज्या परिसरामध्ये रोपवाटिका, नर्सरी आहेत, त्या परिसरातील शेतीत अनेक चांगले प्रयोग घडताना दिसतात. तरुणाईसाठी या व्यवसायात खूप मोठ्या संधी सामावलेल्या आहेत. शेतीपूरक व्यवसायात सगळ्यात चांगला चालणारा व्यवसाय म्हणून अनेक लोक या व्यवसायात येताना दिसतात. अनेक ठिकाणी गावेच्या गावे या व्यवसायात सामावलेली आहेत. भाजीपाला, फळबागा, फुलझाडे, शोभेची झाडे, तसेच ऊस रोपवाटिका, उतीसंवर्धन (टिश्युकल्चर) केळी रोपांच्या व्यवसायाच्या संधी या व्यवसायाने दिल्या आहेत. ऊस शेतीचे फार मोठे क्षेत्र असल्याने शेकडोंच्या संख्येनेउसाच्या रोपवाटिका उभ्या राहिल्या आहेत. त्यातून कोट्यवधीचा व्यवसाय होतो आहे. केवळ आपल्या राज्यापुरतेच नाही,तर गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटकातील अनेक भागात कोल्हापूर, सांगली परिसरातून उसाची रोपे पाठविली जात आहेत. जनुकीय अभियांत्रिकी या नव्या विद्याशाखेच्या आधारे बऱ्याच सजीवांच्या पेशीमधील जनुकीय रचनेची माहिती जनुकीय आरेखनाद्वारे आता उपलब्ध होऊ  लागली आहे. यातून प्रजातीचे मूळ गुणधर्म बदलणे आता शक्य झाले आहे. ‘बॅसिलस थुरीनजीएन्सीस’ या जीवाणूमधील ‘क्राय १ एसी’ या नावाचे जनुक कापूस, सोयाबीन आणि मका या पिकात संस्कारित करून बीटी कापूस, बीटी सोयाबीन आणि बीटी मक्याच्या नव्या जाती निर्माण केल्या गेल्या आहेत. खुल्या चाचण्यांवर बंदी घालण्या सारख्या मुद्दावर ठोस निर्णय होणे गरजेचे आहे.

आपत्ती परिवर्तनाची संधी

‘कोविड-१९’ महामारीतून समाजाचा कोणताही घटक सुटलेला नाही. शेती त्याला अपवाद नाही. आपत्तीला संधीमध्ये परावर्तित करण्याची गरज असते. अशा वेळी शेती व्यवस्था बदलण्याची संधी शेतकऱ्यांना उपलब्ध झालेली आहे. शेती त्यांच्या मालकीची असल्यामुळे शेती व्यवस्था बदलून टाकण्याची ताकद शेतकऱ्यांमध्ये आहे. काळाची गरज म्हणून ‘न्युट्रासिटीकल फार्मिंग’ला जन्म दिला जाऊ  शकतो. सेंद्रिय शेती, झीरो बजेट शेती, न्युट्रीफार्मिंग, नैसर्गिक शेती अशा संरचनेतून ‘न्युट्रासिटीकल फार्मिंग’चा उदय झालेला आहे. हरित क्रांतीनंतरच्या काळात शेतीची स्थिती बदलून रासायनिक शेतीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्याचे आता दुष्परिणाम दिसू लागले आहेत. म्हणून शेतीचा चौथा टप्पा आता जन्माला येत आहे. २०३० नंतर त्याचे खुले स्वरूप पाहायला मिळेल. त्यासाठी नव्या पिढीतील शेतकरी निर्माण करणे आवश्यक आहे. त्याला शेतकरी न म्हणता ‘अ‍ॅग्रिप्रिन्युअर’ म्हणणे उचित असेल.

शेतकऱ्यांचे नवे स्वरूप

अ‍ॅग्रिप्रिन्युअर हा नियोजनबद्ध आणि अचूक शेती व्यवसाय करणारा असेल. शेती व्यवस्थेतील सर्व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारा तज्ज्ञ शेतकरी आहे. त्याला पणन व्यवस्थेचीही चांगली जाण असते. सुगीपूर्व पिकांची काळजी घेताना तो सुदूरसंवेदन तंत्राचा वापर करतो. वायरलेस अ‍ॅग्रिकल्चर करणारा आणि अचूक निदानाची शेती त्याच्या आवाक्यात असेल. यील्ड मॅपिंग, विंड मॅपिंग, पाण्याची गुणवत्ता, व्हेरियबल फर्टिलायझर अ‍ॅप्लिकेशनचे तंत्र वापरणारा आणि आधुनिक पद्धतीने रोग निदान, अन्नधान्याची गुणवत्ता सांभाळणारा शेतकरी आहे. ग्राहकांचे वर्गीकरण करून किंमत धोरण लवचीक ठेवणारा हा शेतकरी आहे. वेगवेगळी ‘सॉफ्टवेअर’ वापरून शेती, हवामान, मृदासंरक्षण आणि पीक संरक्षण करणारा आणि पाण्याचे योग्य नियोजन करणारा (पर्जन्य संकलन, साठवणूक आणि त्याचे योग्य वितरण) असा हा आधुनिक शेतकरी असेल. तो दिवस दूर नाही. शेतीतील प्रत्येक परिवर्तनावर त्याची बारीक नजर असेल. खऱ्या अर्थाने तो नवप्रवर्तक शेतकरी आहे. ‘रोबोट’ व सेन्सार यांच्या मदतीने मृद आरोग्य, पीक आरोग्याचा अभ्यास करून पिकांच्या मागणीची शास्त्रीय नोंद करून त्याप्रमाणे शेती करणारा तो ‘प्रिसिजन फार्मर’ म्हणून ओळखला जाईल. कृषी व्यवस्थेमध्ये चौथी क्रांती ही कृषी तंत्रज्ञानाची असेल. आजवरच्या कोणत्याही मळलेल्या वाटेने न जाता स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारा तो नवप्रवर्तक शेतकरी असेल. ही पावले हळूहळू शेतीत पडू लागलेली आहेत.

२०३० पर्यंतचे कृषी तंत्रज्ञान

सर्वसाधारणपणे कृषी तंत्रज्ञानाची वर्गवारी अनेक गटांमध्ये करता येईल. जैव तंत्रज्ञान, यंत्रज्ञान, सिंचन तंत्रज्ञान, सुगीपूर्व व सुगीपश्चाात तंत्रज्ञान, जी.एम.ओ., क्रिस्पर कॅस-९ व १२, अचूक निदानाचे शेती तंत्रज्ञान, ‘इलेक्ट्रॉनिक’ कृषी तंत्रज्ञान, सुदूर संवेदन तंत्रज्ञान, जैव-शाश्वत तंत्रज्ञान, पोषणक्षम शेती तंत्रज्ञान, दुष्काळ शोसिक पीक तंत्रज्ञान, कृषी रोबोट व ड्रोन तंत्रज्ञान, वायरलेस अ‍ॅग्रिकल्चर आणि सिंथेटिक बायोलॉजीचे नवे तंत्रज्ञान अशा काही बौद्धिक भांडवली स्वरूपाची कृषी तंत्रज्ञान अस्तित्वात येत आहेत.

कृषी तंत्रज्ञानाच्या अंगाने शेतीत चौथी क्रांती घडू लागलेली आहे. तिच्या दृश्य स्वरूप लोकांना २०३० सालापर्यंत स्पष्टपणे दिसायला लागेल. ‘म्युटेशन बायोलॉजी’ आणि ‘डी.एन.ए.’ अथवा ‘आर.एन. ’ तंत्रज्ञानाचा झपाट्याने विकास होत आहे. ‘नॅनो’ तंत्रज्ञान आणि ‘रोबोट’चा शेतीतील वापर खूप मोठी क्रांती घडवू शकतो. ते सर्व आता नजरेच्या टप्प्यातू येऊ न पोहोचलेले आहे. त्याला स्वीकारणारा नवप्रवर्तक शेतकरी तयार करण्याला गती, उत्तेजन देण्याची आवश्यकता आहे.