28 May 2020

News Flash

‘याचा’ पुनर्विचार व्हावा… देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र!

हे पत्र त्यांनी ट्विटही केलं आहे...

(संग्रहित छायाचित्र)

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून एक मागणी केली आहे. त्यात त्यांनी आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असंही म्हटलं आहे… हा निर्णय होता मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासंदर्भातील. ही फेलोशिप बंद होणार असल्यानं याबाबत पुनर्विचार करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

हे पत्र फडणवीस यांनी टि्वटही केलं आहे. त्यात त्यांनी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम ३१ मार्च २०२० पासून बंद करण्याच्या शासनाच्या निर्णचाया पुनर्विचार व्हावा, अशी मागणी केली आहे. १७ फेब्रुवारी रोजी त्यांनी हे पत्र मुख्यमंत्री सचिवालयात दिले आहे.

“या फेलोजचा मी कधीही राजकीय वापर होऊ दिलेला नाही. फेलोजनी नेहमी प्रशासनासोबत काम केले,” असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

सध्या कार्यरत असलेल्या फेलोजचा कार्यकाळ जुलै, ऑगस्ट महिन्यात संपुष्टात येत आहे. त्यापूर्वीच मार्च महिन्यात त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याच्या निर्णयामुळे युवकांमध्ये शासनाप्रती चुकीचा संदेश जात आहे, असे मला प्रकर्षाने वाटते. किमान त्यांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण करण्याची तरी संधी मिळावी असे मला आवर्जून वाटते, असेही फडणवीस यांनी पत्राच्या शेवटी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2020 7:13 pm

Web Title: devendra fadanvis wrote letter to cm uddhav thackeray on governments decision pkd 81
Next Stories
1 महापालिका निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबादेत भाजपाला धक्का!
2 ठाण्यातील तरुणीचा हडसर किल्ल्यावरून पडून मृत्यू
3 Loksatta Poll: महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका झाल्यास होणार ‘टफ फाईट’
Just Now!
X