गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर

शहरातील खून, चोरी, घरफोडया, सोनसाखळी चोरी, तोतया पोलिसांकडून फसवणूक अश्या विविध प्रकारच्या गुन्ह्य़ांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून नाकाबंदी, झोपडपट्टय़ांची तपासणी, सराईत गुन्हेगारांवर लक्ष ठेवणे, पायी गस्त, मोहल्ला समिती, शांतता समितीच्या बैठका यांसारखे प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

Bihar Lok Sabha Election Nitish Kumar Tejashwi Yadav Narendra Modi
तेजस्वींचा उदय, तर नितीश कुमारांचा अस्त; बिहारच्या राजकारणात ‘मोदी फॅक्टर’ चालेल का?
cm eknath shinde lok sabha marathi news, thane lok sabha marathi news
विश्लेषण: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर भाजप नेते हक्क का सांगतात? भाजपच्या रेट्यासमोर शिंदेसेनेची कोंडी?
S Somnath
चांद्रयान ४ मोहिमेबाबत इस्रोच्या प्रमुखांकडून मोठी अपडेट; म्हणाले “पुढील टप्पा…”
Political Speculation Swirls as Former Minister Ambrishrao Atram Remains Absent from Campaigning in Gadchiroli Chimur
भाजपच्या प्रचारात अम्ब्रीशराव आत्राम यांच्या अनुपस्थितीची चर्चा; मन वळविण्यासाठी वरिष्ठ नेत्यांची मध्यस्थी

शहरात विविध गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याबाबतचा तारांकित प्रश्न डॉ. अपूर्व हिरे  यांनी विधान परिषदेत उपस्थित केला होता.या प्रश्नाच्या उत्तरात फडणवीस यांनी माहिती दिली. जानेवारी २०१७ मध्ये खून, दुचारी चोरी, घरफोडी, खून यासारखे ८६ गुन्हे दाखल होते, तर जानेवारी २०१८ मध्ये ८४ गुन्हे दाखल झाले. राजीव नगर झोपडपट्टीजवळ  २७ डिसेंबर २०१७ रोजी जुन्या भांडणाच्या कारणावरून दोघांचा खून झाल्याप्रकरणी पाच संशयित आणि एका विधीसंघर्षीत बालकास अटक करण्यात आली असून या गुन्ह्य़ाचा तपास सुरू असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले आहे.

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत २७ डिसेंबर २०१७ रोजी जुन्या भांडणाच्या कारणावरून खून झाल्याप्रकरणी आठ संशयितांना अटक करण्या आली आहे. याशिवाय महात्मा नगर भागात सात जानेवारी २०१८ रोजी घरफोडी प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात २१ लाख ३५ हजार रूपयांचा ऐवज चोरीला गेला असून त्यापैकी ११ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली आहे.