News Flash

नगरपालिकेत पारदर्शक कारभार देऊ – मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाच्या नगर पालिकेच्या उमेदवारांच्या प्रचार सभेस आले होते.

कितीही विरोध झाला असला तरी शिवस्मारक होईलच असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातील सगळ्या नगर पालिका पारदर्शक कारभाराच्या करण्यासाठी आम्ही नगर पालिकेत पारदर्शकता, गुणवत्ता आणि गतिशीलता या त्रिसूत्री धोरणाचा अवलंब करणार आहे. शहरातील कोणत्याही व्यक्तीला टेबला टेबलांवर फिरत हांजी हांजी करत वेळ घालवयाला नको, असे सांगून पंतप्रधान मोदींनी ८ नोव्हेंबरला जो आíथक लढय़ाचा निर्णय घेतला आहे, त्यात आपण केवळ पन्नास दिवस सनिक म्हणून सहभागी व्हा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारकरांना गांधी मदानाच्या सभेत केले.

देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाच्या नगर पालिकेच्या उमेदवारांच्या प्रचार सभेस आले होते. या वेळी त्यांनी नगर पालिकेत सकारात्मक बदल होण्यासाठी आणि विधायक कार्यासाठी भाजपच्या सर्व उमेदवारांना ही निवडून देण्याचे आवाहन या वेळी केले.

फडणवीस पुढे म्हणाले, पन्नास वर्षांपूर्वी सर्वाधिक लोकसंख्या खेडय़ात होती. मात्र २०११ च्या जनगणनेनंतर नागरी आणि ग्रामीण भागात समान लोकसंख्या असल्याचे दृष्टीस आले आहे. नागरीकरणामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या. पण आपण आता शहरीकरणाला अटकाव करू शकत नाही. याकरिता शहरीकरण हा शाप नसून विकासाची संधी असल्याचा मोदी यांचा विचार आहे. त्यासाठी नागरीकरणाचे सुनियोजन करणे आवश्यक असते म्हणून मोदी सरकारने विविध योजना अमलात आणल्या. त्यात स्मार्ट सिटी योजना, अमृत योजना, स्वच्छ भारत योजना, पाणंदमुक्ती योजना या विविध योजनांद्वारे आता शहरातील बराचसा भाग सुधारत आहे. येत्या दोन वर्षांत यात पूर्णपणे परिवर्तन झालेले दिसेल.

फडणवीस म्हणाले, पुढच्या वर्षी महाराष्ट्रातली ३०० गावे पाणंद मुक्त होतील. त्याच बरोबर घन कचऱ्याचे खत बनवून विकले जाणार आहे. हा कचरा आता कचरा न राहत नगरपालिकेची संपत्ती झाला आहे. नगरपालिकांनी छोटे छोटे उद्योग कसे करावेत यासाठी मार्गदर्शक पुस्तिका तयार केली आहे व तो उभा करण्यासाठी आम्ही सर्व मदत करण्यास तयार आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर येथील ३२ नगर विकास योजना अर्धवट होत्या. त्यातील मार्चपर्यंत २८ योजना पूर्ण केल्या आहेत. मार्च २०१७ मध्ये बाकी योजना पूर्ण केली जातील. सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न २०२२ पर्यंत करण्याची केंद्राची योजना आहे. मात्र २०१९ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या साठी जो निधी कमी पडेल तो आम्ही देऊ, असेही ते म्हणाले.

यापुढे नगरपालिका हद्दीतील घराचा नकाशा संगणकावरच मंजूर होईल. त्यासाठी फिरत बसण्याची वेळ येणार नाही. नगरपालिकांची कामे ‘ई-गव्हर्नन्स’ने अवलंबली जातील. यात एक महिन्यात ‘ई-टेंडर’, शंभर दिवसांत ‘वर्कऑर्डर’ कढली जाईल. यात कामकाजाची सुरवात आणि काम संपवण्याची तारीख असेल त्याचे परीक्षण त्रयस्थ यंत्रणे मार्फत होईल, असे त्यांनी सांगितले. यामुळे कामात पारदर्शकता, गतिशीलता आणि गुणवत्ता येईल, असेही ते म्हणाले.

फडणीस पुढे म्हणाले, की छत्रपती शिवरायांनी सर्वसामान्यांसाठी जे स्पप्न पाहिले होते. त्याचा आदर्श घेत पंतप्रधान मोदी त्यांच्या पावलावर पाऊल टाकून वाटचाल करत आहेत. त्यासाठी त्यांनी काही कठोर निर्णय घेतले. नोटाबंदीचा निर्णय त्यातलाच. या निर्णयामुळे त्यांनी एका दगडात तीन पक्षी मारले. एक म्हणजे काळेधंदेवाल्यांवर टाच आणली, नक्षली-दहशदवादी आपली अर्थव्यवस्था खिळखिळी करत होते त्याला चाप लावला व जे कर भरत नव्हते, पसे लपवून ठेवत होते, त्यांचा असा बेहिशेबी पसा निरोपयोगी झाला तर सर्वसामान्यांच्या घामाच्या पशाला किंमत आली. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना काही प्रमाणात त्रास होतो आहे मात्र देशासाठीच्या या लढाईत त्यांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे. केंद्रात मोदींचे अर्थात भाजपचे सरकार आहे, राज्यात भाजपचे सरकार आहे आता सातारा नगरपालिकेतही भाजपचे सरकार आणा. दोन्ही ठिकाणी आम्हाला एक संधी दिलीत आता नगरपालिकेसाठी एक संधी भाजपला द्या, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

या वेळी राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सभेस भाजपचे सर्व उमेदवार आणि पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी भाजपच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2016 1:11 am

Web Title: devendra fadnavis comment on nagar palika election
Next Stories
1 सावंतवाडीत तिरंगी लढत
2 राजापूर नगराध्यक्षपदासाठी जोरदार चुरस
3 सच्च्या शिवसैनिकाला चहा टपरीचा आधार!
Just Now!
X