News Flash

देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात, प्रवीण दरेकर यांना किरकोळ दुखापत

ब्रेक फेल होऊन गाड्यांची एकमेकांना धडक

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस. (संग्रहित छायाचित्र)

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील एका गाडीला बुधवारी रात्री जळगाव येथे अपघात झाला. मुंबई-नागपूर महामार्गावर नशिराबाद येथे हा अपघात झाला. या अपघातात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना किरकोळ दुखापत झाली आहे. एबीपी माझा वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे.

फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीचे ब्रेक फेल होऊन गाड्यांची एकमेकांना धडक झाली. भालोदहून परतत असताना हा अपघात झाला. ताफ्यातील एका गाडीने पुढे असणाऱ्या दरेकर यांच्या गाडीला धडक दिली. यामध्ये गाडीचे नुकसान झाले. दरेकर यांनाही किरकोळ दुखापत झाली. देवेंद्र फडणवीस आणि अन्य सर्व सुखरुप असल्याची माहिती आहे.

देवेंद्र फडणवीस दोन दिवस जळगाव दौऱ्यावर आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे कोविड रूग्णालयाला भेट देऊन वैद्यकीय अधिकार्‍यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी जळगावकडे प्रयाण केले. जळगावमध्ये उद्या त्यांचा दौरा आहे. ते जळगावमधील रुग्णालयांना भेट देऊन करोना व्हायरसच्या स्थिती संदर्भात माहिती घेणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 9:18 pm

Web Title: devendra fadnavis convoy car accident at jalgaon dmp 82
Next Stories
1 राज्यात ६ हजार ६०३ नवे करोनाबाधित, १९८ जणांचा मृत्यू
2 कौशल्य विकास विभागाचं नाव बदललं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झालेले महत्त्वाचे निर्णय
3 आचार्य विनोबा भावे ग्रामीण रूग्णालयास करोना चाचणी प्रयोग शाळेचा दर्जा
Just Now!
X