05 August 2020

News Flash

‘तान्हाजी’ चित्रपट करमुक्त करा; देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

"उत्तर प्रदेश आणि हरयाणा या राज्यांनी 'तान्हाजी' चित्रपट करमुक्त केला आहे. त्यामुळे तान्हाजींचे कार्यक्षेत्र असलेल्या महाराष्ट्रातही हा चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय त्वरीत घ्यावा"

'तान्हाजी- द अनसंग वॉरियर'

स्वराज्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, त्या तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित ‘तान्हाजी’ हा चित्रपट करमुक्त करावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक पत्राद्वारे केली आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात, “तानाजी मालुसरे हे एक वीर योद्धा होते. त्यांचे शौर्य नव्या पिढीसमोर यावे आणि त्यांच्या वीरतेच्या गाथा नव्या पिढीला कळाव्यात त्यासाठी हा चित्रपट अधिकाधिक लोकांनी पहावा यासाठी तो करमुक्त करण्यात यावा.”

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी इतिहासात कोंढाणा किल्ला सर करण्याचा तानाजी मालुसरे यांचा प्रसंग ऐतिहासिक आणि विलक्षण आहे. शिवछत्रपतींचे विश्वासू सहयोगी म्हणून तानाजी मालुसरे यांनी जिवाची बाजी लावून हा महत्त्वाचा गड सर केला आणि स्वराज्यासाठी बलिदान दिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अधिकाधिक शिवभक्त आणि मराठीजनांपर्यंत हा चित्रपट पोहोचणे आणि या ऐतिहासिक स्मृतींचे जतन होणे अतिशय आवश्यक आहे,” असेही फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे.

उत्तर प्रदेश आणि हरयाणा या राज्यांनी ‘तान्हाजी’ चित्रपट करमुक्त केला आहे. त्यामुळे तान्हाजींचे कार्यक्षेत्र असलेल्या महाराष्ट्रातही हा चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय त्वरीत घ्यावा, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2020 8:36 pm

Web Title: devendra fadnavis has written a letter to cm uddhav thackeray demanding to make tanhaji movie tax free in the state aau 85
Next Stories
1 आता हरयाणामध्येही ‘तान्हाजी’ टॅक्स फ्री; महाराष्ट्रात कधी?
2 कपिल शर्माच्या लेकीचा पहिला फोटो झाला सोशल मीडियावर व्हायरल
3 सलमाननं ईदसोबतच ख्रिसमससुद्धा केला बुक; ‘किक २’ प्रेक्षकांच्या भेटीला
Just Now!
X