25 September 2020

News Flash

‘नया है वह’, म्हणत फडणवीस यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

डिझॅस्टर टुरिझमच्या टिकेला उत्तर

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस. (संग्रहित छायाचित्र)

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ‘डिझॅस्टर टुरिझम’ अशी टिका केल्यानंतर फडणवीस यांनी या टीकेला उत्तर दिलंय. नया है वहं, म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.

पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांना जे योग्य वाटतात त्यांना मंत्री बनवता येतं. पण मंत्री बनवल्यानं शहाणपण येतंच असं नाही ना? ते (आदित्य ठाकरे) नवीन आहेत. माझ्यासारख्या माणसानं त्यावर फारकाही प्रतिक्रियाही देऊ नये.”

करोनाकाळात लोकांना मदत करण्याऐवजी विरोधी पक्षातील मंडळी सरकारवर टीका करत राज्यभर फिरत आहेत. ते सध्या आपत्ती पर्यटनात (डिझॅस्टर टुरिझम) व्यग्र आहेत, असा टोला राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी लगावला होता. विरोधी पक्ष काय करतो, यापेक्षा आम्ही लोकांना अधिकाधिक मदत कशी करता येईल आणि प्रत्येकाचे आरोग्य सुदृढ राहील यावर भर देत आहोत, असेही ते म्हणाले होते.

आदित्या ठाकरे यांच्या या टीकेवर रविवारी देवेंद्र फडणवीस यांनी वरील उत्तर दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2020 2:11 pm

Web Title: devendra fadnavis on aditya thackeray disaster tourism maharashtra covid pkd 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 आपण क्वारंटाइन झाल्याचं वृत्त खोटं, राज्यपाल कोश्यारी यांनी दिली माहिती
2 ऑनलाइन शिक्षणाऐवजी, शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांना घरपोच शिक्षण
3 परीक्षांसदर्भात राज्यपालांनी आतातरी पुनर्विचार करावा; संजय राऊत यांचा सल्ला
Just Now!
X