News Flash

“….म्हणून दोन दिवसांचं अधिवेशन”, वाझे प्रकरणाचा दाखला देत फडणवीसांचा आरोप

मंत्री आपल्या विभागाचे राजे, प्रत्येक विभागात एक वाझे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

Fadnavis criticizes Thackeray government
देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर दोन दिवसांच्या अधिवेशना मुळे टीका केली आहे (संग्रहित छायाचित्र)

प्रत्येक विभागात एक वाझे आहे. तो आम्हाला माहित आहे. पण आम्हाला तो सांगता येऊ नये म्हणून दोन दिवसांचं अधिवेशन घेण्यात येत असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. भाजपाच्या महाराष्ट्र कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या प्रत्येक विभागामध्ये एक वाझे आहे. आम्हाला तो माहित आहे. आम्ही तो सांगू नये, आम्हाला सांगता येऊ नये म्हणून अधिवेशन दोन दिवसांचं करण्यात आलं आहे. ५ जुलैला होणाऱ्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनावर फडणवीस यांनी टीका केली आहे. फडणवीस म्हणतात, विविध विभागातील वाझेंचा पत्ता आमच्याकडे आलेला आहे. तो आम्हाला सांगता येऊ नये म्हणून अधिवेशन दोन दिवसांचे करण्यात आले आहे.

हेही वाचा- ‘महाराष्ट्र मॉडेल आहे की, मृत्यूचा सापळा’, देवेंद्र फडणवीस यांचं सरकारवर टीकास्त्र

या कार्यक्रमात बोलताना ते पुढे म्हणतात, ” अजून फक्त पोलीस खात्यातला वाझे समोर आला आहे. मात्र प्रत्येक खात्यामध्ये एक सचिन वाझे आहे. मंत्री आपापल्या विभागातले राजे आहे. पण प्रत्येक विभागातला वाझे आम्हाला माहित आहे. तो आम्हाला समोर आणता येऊ नये म्हणून यंदाचं पावसाळी अधिवेशन फक्त दोन दिवसांचं ठेवलं आहे.

महाविकास आघाडी सरकारमधला भ्रष्टाचार आणि गोंधळ लपवण्यासाठीही हे अधिवेशन दोन दिवसांत उरकण्याचं ठरवलं आहे असा आरोपही त्यांनी सरकारवर केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2021 3:41 pm

Web Title: devendra fadnavis slams maharashtra government in bjp meeting today vsk 98
Next Stories
1 भाजपाचा रोख आता अजित पवारांच्या दिशेने! ‘या’ प्रकरणात केली CBI चौकशीची मागणी!
2 वटपौर्णिमा विशेष: यशोमती ठाकूर म्हणतात, मी ‘या’ सावित्रीची उपासक आहे!
3 पालघरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के; ३.७ रिश्टर स्केल तीव्रता
Just Now!
X