प्रत्येक विभागात एक वाझे आहे. तो आम्हाला माहित आहे. पण आम्हाला तो सांगता येऊ नये म्हणून दोन दिवसांचं अधिवेशन घेण्यात येत असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. भाजपाच्या महाराष्ट्र कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या प्रत्येक विभागामध्ये एक वाझे आहे. आम्हाला तो माहित आहे. आम्ही तो सांगू नये, आम्हाला सांगता येऊ नये म्हणून अधिवेशन दोन दिवसांचं करण्यात आलं आहे. ५ जुलैला होणाऱ्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनावर फडणवीस यांनी टीका केली आहे. फडणवीस म्हणतात, विविध विभागातील वाझेंचा पत्ता आमच्याकडे आलेला आहे. तो आम्हाला सांगता येऊ नये म्हणून अधिवेशन दोन दिवसांचे करण्यात आले आहे.

हेही वाचा- ‘महाराष्ट्र मॉडेल आहे की, मृत्यूचा सापळा’, देवेंद्र फडणवीस यांचं सरकारवर टीकास्त्र

या कार्यक्रमात बोलताना ते पुढे म्हणतात, ” अजून फक्त पोलीस खात्यातला वाझे समोर आला आहे. मात्र प्रत्येक खात्यामध्ये एक सचिन वाझे आहे. मंत्री आपापल्या विभागातले राजे आहे. पण प्रत्येक विभागातला वाझे आम्हाला माहित आहे. तो आम्हाला समोर आणता येऊ नये म्हणून यंदाचं पावसाळी अधिवेशन फक्त दोन दिवसांचं ठेवलं आहे.

महाविकास आघाडी सरकारमधला भ्रष्टाचार आणि गोंधळ लपवण्यासाठीही हे अधिवेशन दोन दिवसांत उरकण्याचं ठरवलं आहे असा आरोपही त्यांनी सरकारवर केला आहे.