News Flash

गुड्डया खूनप्रकरणी अ‍ॅड. उज्ज्वल निकम सरकारी वकील

गुड्डया खून प्रकरणातील आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे.

अॅड. उज्ज्वल निकम (संग्रहित छायाचित्र)

धुळे येथील कुख्यात गुंड रफीउद्दीन शेख उर्फ गुड्डया याच्या खून प्रकरणाच्या न्यायालयीन कामकाजासाठी अॅड. उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती आमदार अनिल गोटे यांनी शक्रवारी दिली. धुळे शहरासह संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणार्‍या खून खटल्यातून आरोपींची निर्दोष सुटका होऊ नये, यासाठी विशेष विनंती करुन अॅड.निकम यांची नियुक्ती करुन घेतल्याचे गोटे यांनी सांगितले.

गुड्डयाचा निर्घृण खून करण्यात आला होता. या हत्याकांडाचा सोक्षमोक्ष लागावा याकरिता अॅड. निकम यांची नियुक्ती करावी म्हणून गोटे यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती. धुळे शहरात यापूर्वी घडलेल्या ६-७ हत्याकांडातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता कशा प्रकारे झाली व तपासात कशा प्रकारे त्रुटी ठेवण्यात आल्या याकडे गोटे यांनी लक्ष वेधले. गुड्डया खून प्रकरणातील आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. परंतु, तपासामध्ये आवश्यक ती गती पोलीस यंत्रणेने घेतली नसल्याची तक्रार गोटे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

हत्याकांडामागे एक सुनियोजित कट असून गुड्डयाचे हत्याकांड केवळ दोन टोळीतील युध्द नसून यामागे काही राजकीय नेत्यांचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे गंभीर आरोप त्यांनी केले. उज्वल निकम यांच्या नियुक्तीमुळे निष्पाप धुळेकर जनतेला गुंडगिरीपासून दिलासा मिळेल, असे गोटे यावेळी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2017 9:01 pm

Web Title: devendra fadnavisappointed ujjwal nikam as government advocate in dhule murder case
Next Stories
1 मोदींना उत्तर देण्याची सवय नाही, खासदारांवर संतापतात; नाना पटोलेंची टीका
2 औरंगाबादमध्ये १२ वर्षांच्या मुलीचा मृत्यू डेंग्यूमुळे झाल्याची शक्यता
3 जळगावमध्ये कर्जबाजीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
Just Now!
X