कर्जत खालापुर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे प्रतिनिधीत्व केलेले माजी आमदार देवेंद्र साटम भाजपच्या वाटेवर आहेत. पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी सेनेला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. साटम यांच्या भाजप प्रवेशामुळे त्यामुळे उत्तर रायगडात सेनेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

कर्जत खालापुर हा मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. मात्र आंतर्गत गटबाजी आणि पाडापाडीच्या राजकारणात मतदारसंघात सेनेची वाताहत होत गेली. त्यामुळे जुने जाणते कार्यकत्रे आता पक्षाला सोडून जाऊ लागले आहेत. यात आता माजी आमदार देवेंद्र साटम यांचे नावही जोडले जाणार आहे. सेनेकडून सलग तीनवेळा कर्जत खालापुर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारया साटम यांनी आता शिवबंधन तोडण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी भाजपत प्रवेश करण्याची तयारी सुरू केली आहे. नवरात्रात हा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे.

uday samant kiran samant narayan rane
रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून भाजपाच्या नारायण राणेंना उमेदवारी; उदय सामंत म्हणाले, “आम्ही राजकारणातून…”
Narayan Rane
भाजपाकडून रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून नारायण राणेंना तिकीट! शिंदेंच्या शिवसेनेची इथेही माघार
fight between Rajshree Hemant Patil and Sanjay Deshmukh in Yavatmal-Washim Lok Sabha Constituency
यवतमाळात शिवसेना विरूद्ध शिवसेनाच! १७ उमेदवार रिंगणात
devendra fadnavis
इंदापूरमधील नाराजीवर मनोमीलन सभेचा उतारा; देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मेळावा

कर्जत खालापुर मतदारसंघात शिवसेना रुजवण्याचे आणि ती मोठी करण्याचे काम साटम यांनी केले होते. बाळासाहेब ठाकरे यांचे अतंत्य विश्वासू आणि एकनिष्ठ सहकारी म्हणूनही ते ओळखले जात. हिबाब लक्षात घेऊन सेनेकडून सलग तीन वेळा त्यांना मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र 2009 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांना पक्षांतर्गत गटबाजीचा सामना करावा लागला. हनुमंत पिंगळे यांनी बंडखोरी करत निवडणुक लढवल्याने सेनेच्या मतांचे विभाजन झाले, त्यामुळे साटम यांचा पराभव करून राष्ट्रवादीचे सुरेश लाड निवडून आले.

या पराभवानंतर साटम हे पक्षांच्या मुख्य प्रवाहापासून बाजूला गेले. साटम यांच्याविरोधात निवडणुक लढवणारया हनुमंत पिंगळे यांना सेनेनी पुन्हा पक्षात घेतले आणि खालापुर तालुका प्रमुखपदाची जबाबदारी सोपवली. हनुमंत पिंगळे यांना पुन्हा पक्षात घेऊ नये अशी भुमिका साटम यांची होती. पण त्यांचे म्हणणे सेनेच्या वरीष्ठ नेत्यांनी ऐकले नाही. यामुळे दुखावलेल्या साटम यांनी पक्षांआंतर्गत बाबीपासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न केला. २०१४ च्या निवडणुकीत सेनेला कर्जत मध्ये पुन्हा एकदा आंतर्गत गटबाजीचा फटका बसला. महेंद्र थोरवे यांनी बंडखोरी करत शेकापकडून निवडणूक लढवली, त्यामुळे सेनेच्या उमेदवाराचा पुन्हा एकदा पराभव झाला.

मतदारसंघातील पक्षांतर्गत गटबाजी आणि पाडापाडीच्या राजकारणामुळे साटम यांनी सेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. शिवबंधन सोडून लवकरच ते भाजपत प्रवेश करणार आहेत. मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नवरात्रात साटम यांचा पक्षप्रवेश पार पडणार आहे. राज्यातील इतर भागांच्या तुलनेत कोकणात भाजपची ताकद मर्यादीत आहे. त्यामुळेच इतर पक्षातील प्रस्थापित नेत्यांना पक्षात घेऊन संघटना बांधणी करण्यावर भाजप नेतृत्वाने भर दिला आहे. अशातच साटम यांच्या सारखा प्रस्तापित नेताच पक्षात येणास तयार झाल्याने पक्षाची ताकद वाढण्यास मदत होणार आहे. शिवसेनेनी आंतर्गत गटबाजी वेळीच थोपवली नाही, तर इतर मतदारसंघातही कर्जत खालापुर सारखी पुर्नआवृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही.

पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता मी आजवर कार्यरत होतो. मात्र पक्षांतर्गत गटबाजीमुळे मी व्यथीत झालो. ज्या पक्षाची पाळमुळ रुजावी यासाठी मी काम केले त्याच पक्षातीले नेते माझे खच्चीकरण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मीच सेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.   –   देवेंद्र साटम, माजी आमदार