News Flash

नशिक राज्यमार्गावर लक्झरी व रिक्षा मध्ये अपघातात एक भाविक ठार 

सहाजण गंभीर जखमी, जखमींमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश

गुजरात  मधील नवसारी येथील  भाविकांची  त्र्यंबकेश्वर येथे दर्शन घेऊन कासा मार्गे मुंबई अहमदाबाद हायवेकडे येत असताना वेती गावाजवळ रिक्षा आणि ट्रॅव्हलसचा भीषण अपघात घडल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास घडली .या अपघातात नवसारी येथील उषाबेन जोशी (वय 57)ही महिला चेंगरून जागीच ठार झाली तर लक्झरी बसमधील तीन जण आणि रिक्षामधून शाळेतून घरी जाणारे विद्यार्थी रुपेश सोगले,(वय 12) व अशोक बुंधे(,वय14 )हे गंभीर जखमी झाले आहेत. तर रस्त्यावर उभा असलेला प्रवासी मंगल्या भोईर (वय 49) हा किरकोळ जखमी झाला आहे. गंभीरजखमीना जवळच्या कासा उप जिल्हा रुग्णालयात उपचार करून गुजरात येथील रुग्णालयात पाठवले असून पुढील तपास कासा पोलीस करत आहेत.

डहाणू नाशिक राज्यमार्गावर कास‍ पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेती (कोद्या पाडा) येथे शिवम ट्रव्हल्स या भाविकांच्या लक्झरी व रिक्षा मध्ये ठोकर लागुन भीषण  अपघात घडला. रिक्षा चालकाने खड्याजवळ ब्रेक दाबल्याने लक्झरी चालकाने रिक्षा वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गाडीचा तोल गेला आणि लक्झरी बस खोल खड्यात पडली. त्यामध्ये रिक्षा आणि ट्रॅव्हल्समधील प्रवासी जखमी झाले. या लक्झरी बस मध्ये एकूण 38 प्रवासी होते,त्यातील 12 जणांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत,

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2019 10:43 pm

Web Title: devotee killed luxury and rickshaw crash on the nashik state highway abn 97
Next Stories
1 “हे फडणवीस असो की नाना फडणवीस, काय बोलणार हे सांगायची गरज नाही”
2 भाजपा सरकारने सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक केली : धनंजय मुंडे
3 मनसेला आघाडीसोबत का घेतलं नाही? शरद पवार म्हणतात…
Just Now!
X