आर्थिक पाहणी अहवालातली आकडेवारी तपासून पाहण्यासाठी दोन्ही सभागृहाच्या सदस्यांची समिती नेमण्यात यावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली. जगातल्या प्रसिद्ध अशा १०८ अर्थतज्ज्ञ आणि सांख्यिकी शास्त्रज्ञांनी मार्च २०१९ ध्ये भारतात जी अर्थविषयक आकडेवारी दिली जाते आहे ती वाढवून सांगितली जात असल्याचे निवेदन दिले होते. त्याचे समर्थन करणारे वक्तव्य केंद्र सरकारने नेमलेले आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी केले होते. त्यांच्या मते भारताचा विकासदर अडीच टक्के फुगवून सांगितला जात आहे. आजचा आर्थिक अहवाल राज्याच्या अर्थव्यवस्थेशी निगडीत आहे. त्यातील आकडेवारीच्या खरेपणाबाबत संशय व्यक्त करत सर्वपक्षीय सदस्यांची समिती नेमली जावी अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली.

 

विधान परिषदेत सादर झालेल्या आर्थिक पाहणी अहवाबाबत विरोधकांनी शंका घेतली आहे. आता याबाबत सरकार काय करणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. आज सादर झालेल्या आकडेवारीबाबत मात्र विरोधकांनी संशय घेतला आहे. यासाठी त्यांनी जगप्रसिद्ध अर्थ तज्ज्ञांही उदाहरण दिले आहे.