News Flash

माझ्या पीआरओचा व्हॉट्सअॅप बंद करण्यात आला, धनंजय मुंडेंचा आरोप

'आणीबाणीच्या दिशेने टाकलेलं हे पहिलं पाऊल आहे'

विधानपरिषदेचे विरोध पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपल्या जनसंपर्क अधिकाऱ्याचं व्हॉट्सअॅप अचनात बंद करण्यात आल्याचा आरोप केला आहे. धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, माझे जनसंपर्क अधिकारी प्रशांत जोशी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून बातम्या आणि माझ्या राजकीय बैठका तसंच बातम्या शेअर करण्यासाठी वापरतात.

‘हे असं काहीतरी पहिल्यांदाच होत आहे. विरोधी पक्षनेत्याच्या जनसंपर्क अधिकाऱ्याच्या फोनवर बंदी आणत आणीबाणीच्या दिशेने टाकलेलं हे पहिलं पाऊल आहे’, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे.

‘बुधवारी संध्याकाळी अचानक माझं व्हॉट्सअॅप बंद झालं. जेव्ही मी नव्याने व्हॉट्सअॅप इन्स्टॉल करण्याचा प्रयत्न केला तेव्हा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी तुमच्या फोन क्रमांकावर व्हॉट्सअॅप वापरण्यावर बंदी आणण्यात आल्याचा मेसेज आला’, अशी माहिती प्रशांत जोशी यांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2019 9:54 am

Web Title: dhananjay munde claims his pros whatsapp disabled
Next Stories
1 प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी आता निर्बंधमुक्त
2 काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात पुन्हा कमळ फुलविण्याची भाजपची धडपड
3 चिली-आफ्रिकी द्राक्षांमुळे भारतीय द्राक्षांच्या निर्यातीवर परिणाम
Just Now!
X