News Flash

‘आज आम्ही मंत्रालयात अडवलं, उद्या ही जनताच अडवेल’

'शब्दांचा खेळ करणे थांबवा आणि आरक्षण कधी देणार ते सांगा'

धनगर समाजाच्या आरक्षणाचा तिढा सुटत नाही तोवर मंत्रालयाची पायरी चढू शकणार नाही, असं जाहीर वक्तव्य करणाऱ्या राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी टीका केली आहे. ‘शब्दांचा खेळ करणे थांबवा आणि आरक्षण कधी देणार ते सांगा’, असं धनंजय मुंडेंनी पंकजा यांचं नाव न घेता म्हटलं आहे. तसंच, ‘आज आम्ही मंत्रालयात अडवलं, पण उद्या सरकारमध्ये येण्यापासून ही जनताच तुम्हाला अडवेल’ असा इशाराही त्यांनी दिला आहे. ट्विटरद्वारे धनंजय मुंडे यांनी पंकजा यांच्यावर निशाणा साधलाय.


यापूर्वी, पंकजा मुंडे यांनी नांदेडमध्ये धनगर आरक्षण जागर परिषदेत उपस्थिती लावली होती. या सभेत पंकजा मुंडे यांनी भाषणात उपस्थितांना धनगर समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय परत मंत्रालयात प्रवेश करू शकणार नाही, याचा विश्वास असल्याचं जाहीर वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आज सकाळी मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला पंकजा मुंडे उपस्थित होत्या. पण मंत्रालयात प्रवेश करताना धनगर समाजाचे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार रामराव वडकुते यांनी पंकजा मुंडे यांना अडवलं आणि जाब विचारला. ‘तुम्ही धनगर समाजाची फसवणूक करत आहात. आज शब्द बदलून मंत्रालयाची पायरी चढला आहात. पण २०१९ नंतर धनगर समाज तुम्हाला मंत्रालयात येण्याची वेळच येऊ देणार नाही’, असं रामराव वडकूते यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2019 7:05 pm

Web Title: dhananjay munde criticize pankaja munde dhangar reservation
Next Stories
1 कोतवालांच्या मानधनात २५०० रूपयांनी वाढ
2 ‘नितीन गडकरींच्या गांधी घराणे प्रेमाचे कारण काय?’
3 असा आहे उद्धव ठाकरेंचा मराठवाडा दौरा
Just Now!
X