News Flash

तोंडाला मास्क न बांधता रावसाहेब दानवे आणि धनंजय मुंडेंमध्ये चर्चा

करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सामाजिक अंतर आणि तोंडाला मास्क बांधणे आवश्यक आहे.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी शुक्रवारी  केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांची भोकरदन येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीचे फोटो समोर आले आहेत. त्यात कौटुंबिक सत्कारात दोन्ही मंत्र्यांसह उपस्थितांनी तोंडाला मास्क बांधले नसल्याचे दिसत आहे.

करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सामाजिक अंतर आणि तोंडाला मास्क बांधणे आवश्यक आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्यासमवेत रावसाहेब दानवे पाटील यांची भेट घेतली.

दानवे पाटील कुटुंबीयांनी मंत्री मुंडे यांचा सत्कार करून स्वागत केले. त्यानंतर दोन्हीही नेत्यांमध्ये बसून कापूस,हरभरा, तूर हमीभावाने खरेदी बाबत शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणीवर सविस्तर चर्चाही झाली.

याबाबतची माहिती मंत्री मुंडे यांच्याकडून माध्यमांना देण्यात आली. मात्र केंद्रीय मंत्र्यांच्या निवासस्थानी सत्कार आणि चर्चेच्या समोर आलेल्या फोटोंमध्ये दोन्ही मंत्र्यांसह उपस्थित मान्यवरांनी मास्क वापरले नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. करोना विषाणूचां संसंर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने जनतेला मास्क बांधण्याचे आवाहन करत असतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2020 7:36 pm

Web Title: dhananjay munde meet raosaheb danve at his home dmp 82
Next Stories
1 आमच्या नाकाखाली काय सुरू होतं ते उशिरा समजलं : फडणवीस
2 … तर भांडायचं ठरवलं असतं तरी महाराष्ट्रात फक्त शिवसेना-भाजपा राहिले असते : देवेंद्र फडणवीस
3 निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचं सगळं ठरलं होतं- फडणवीस
Just Now!
X