25 January 2021

News Flash

धनंजय मुंडे-रेणू शर्मा प्रकरणावर जयंत पाटील यांनी प्रथमच मांडली भूमिका

मेहबूब शेख प्रकरणाचा दिला हवाला

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे. (संग्रहित छायाचित्रः पीटीआय)

धनंजय मुंडे-रेणू शर्मा प्रकरणावरून राज्यात विरोधकांनी मुंडे आणि ठाकरे सरकारला घेरण्याचे प्रयत्न सुरू केल्याचं दिसत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काय भूमिका मांडणार याकडे लक्ष लागलं होतं. अखेर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या प्रकरणावर भूमिका मांडली आहे.

अहमदनगर येथील एका कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या प्रकरणावर आपली भूमिका मांडली. “राजकारणात आयुष्य उभं करायला, राजकीय स्तरावर यायला प्रचंड कष्ट घ्यावे लागतात. कोणी आरोप केल्यावर सत्यता न पडताळता लगेच निष्कर्षावर येणं योग्य नाही. धनंजय मुंडेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उच्च न्यायालयात देखील यापूर्वीच अर्ज दाखल केलेला आहे. ही न्यायालयीन बाब आहे. कुटुंबातील अंतर्गत बाब आहे. धनंजय मुंडेंनी याबाबत स्पष्ट मत व्यक्त केलं आहे,” असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.

मुंडे-शर्मा प्रकरणावर बोलताना त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर झालेल्या आरोपांचाही हवाला दिला. “राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावरही आरोप झाले. या प्रकरणाचा खुलासा झाला. यात काही अर्थ नसल्याचं निष्पन्न झालं. कोणीही आरोप केले म्हणजे अंतिम निष्कर्षला पोहोचणं योग्य नाही. मुंडे यांच्याबाबतही याबाबत‌ चौकशी होईल, खुलासा होईल. त्यांनी जो खुलासा केला तो समोर आहे,” असं जयंत पाटील म्हणाले.

चुकीच्या कृत्यांबद्दल तात्काळ राजीनामा द्यावा-चंद्रकांत पाटील

“सामाजिक न्यायमंत्री असलेल्या धनंजय मुंडे यानी आपल्या चुकीच्या कृत्यांबद्दल तात्काळ राजीनामा द्यायला हवा. मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप पाहता त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा कोणताही हक्क नाही. भारतीय जनता पार्टीच्या महिला शाखेच्या वतीने एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून, त्यामध्ये मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आम्हीही आता याविषयी आणखी जोरदार मागणी करणार आहोत. ज्या व्यक्तीवर अशा प्रकारचे आरोप होतात, त्याला या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नसतो. मात्र, गेंड्याच्या कातडीचे हे मंत्री आणि महाविकास आघाडीचे सरकार याबाबत आत्मपरीक्षण करून मुंडेंचा राजीनामा घेतील, असं वाटतं नाही. तरीही मुंडे यांनी या पदाचा राजीनामा द्यावा, अशी आमची मागणी आहे,” अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2021 5:20 pm

Web Title: dhananjay munde renu sharm case jayant patil reaction on rape case file against dhananjay munde bmh 90
Next Stories
1 “…पण गेंड्याच्या कातडीचे सरकार मुंडेंचा राजीनामा घेतील, असं वाटत नाही”
2 मुंडे प्रकरण: पत्नी-मुलांची माहिती लपवणं आणि निवडणूक आयोग; जाणून घ्या कायदा काय सांगतो
3 हे मृत्यू अत्यंत क्लेशदायक; राज्यपालांनी व्यक्त केली हळहळ
Just Now!
X