01 March 2021

News Flash

गुजरातला जमतं ते महाराष्ट्राला का नाही? , इंधन दरांवरुन धनंजय मुंडेंचा फडणवीसांना सवाल

गुजरात राज्याने पेट्रोल आणि डिझेल दोन्हीच्या दरात कपात केली, मात्र महाराष्ट्र सरकारने फक्त पेट्रोलच्या दरात कपात केली

(संग्रहित छायाचित्र)

केंद्र सरकारने आज अखेर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत अडीच रुपयांची कपात करण्याची घोषणा केली. केंद्र सरकारच्या घोषणेनंतर राज्य सरकारनेही आणखी अडीच रुपयांनी पेट्रोलच्या किंमती कमी करण्याचं जाहीर केलं, त्यामुळे राज्यात पेट्रोल च्या किंमती 5 रुपयांनी कमी झाल्या आहेत. मात्र, राज्य सरकारने डिझेलचे दर जैसे थेच ठेवले आहेत. यावरुन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. गुजरात राज्याने पेट्रोल आणि डिझेल दोन्हीच्या दरात कपात केली, मात्र महाराष्ट्र सरकारने फक्त पेट्रोलच्या दरात कपात करुन राज्यातील जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं आहे, अशी टीका धनंजय मुंडेंनी केली आहे. तुमच्याच काळात पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला भिडले आणि आता दर कमी केल्याबद्दल अभिनंदन कसले करून घेता ? चार वर्षे लुटल्यानंतर आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दर कमी करण्याचा घेतलेला हा निर्णय म्हणजे सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण आहे. अशा शब्दांमध्ये धनंजय मुंडेंनी फडणवीस सरकारचा समाचार घेतला.

केंद्राने ज्याप्रमाणे इंधनांच्या किंमतीत अडीच रुपयांचा दिलासा दिला, तसाच दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने अडीच रुपयांची कपात करावी असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं होतं. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात पेट्रोल प्रतिलिटर पाच रुपयांनी कमी केल्याचं जाहीर केलं. मात्र, डीझेलच्या किंमतीत राज्य सरकारकडून कोणतीही अतिरिक्त कपात करण्यात आलेली नाही. आज मुंबईमध्ये पेट्रोल 91.34 रुपये तर डिझेल 80.10 रुपयांना विकले जात होते, पण नवे दर तातडीने लागू झाल्यामुळे नव्या दराप्रमाणे पेट्रोल 86.34 रुपयांना मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2018 6:31 pm

Web Title: dhananjay munde slams maha govt on fuel price reduction
Next Stories
1 सांगलीतील वसतिगृहात गळफास घेऊन विद्यार्थिनीची आत्महत्या
2 आधी दळभद्री सरकारमधून बाहेर पडा, मगच अयोध्येला जाण्याची नौटंकी करा! – राधाकृष्ण विखे पाटील
3 प्लॅस्टिक बॅग बाळगणाऱ्यांना भररस्त्यात उठा-बशा काढायची शिक्षा
Just Now!
X