News Flash

धनगर आरक्षणाबाबत सरकार संवेदनशील नाही – धनंजय मुंडे

विरोधकांकडून धनगर आरक्षणाचा मुद्दा लावून धरण्यात आला.

संग्रहित छायाचित्र

पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी पुन्हा एकदा धनगर आरक्षणाचा मुद्दा लावून धरला. दरम्यान, धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल सरकार संवेदनशील नसल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे व्यक्त केला.

धनगर आरक्षणाबाबतचा टिसचा अहवाल सभागृहापुढे सादर न करता अटर्नी जनरलकडे सुपूर्द करण्यात आला. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार संवेदनशील नाही हेच खरे. आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेता येत नसल्यानेच, सत्ताधारी सभागृहात गोंधळ घालून चर्चा होऊ देत नाही, असे मुंडे यावेळी म्हणाले. तसेच त्यांनी यावेळी सरकारचा निषेध केला.

दरम्यान, सर्वांनी धनगर आरक्षणाची चर्चा उपस्थित केली होती. तसेच सरकार किती दिवसांमध्ये धनगर आरक्षण देणार याचे उत्तर अपेक्षित होते. परंतु जेव्हा चर्चा सुरू झाली जेव्हा सत्ताधाऱ्यांकडून गोंधळ घालण्यात आला. याचाच अर्थ त्यांना आरक्षण द्यायचेच नाही असा होतो, असा आरोपही त्यांनी केला. टिसच्या अहवालात काय आहे, हे दोन्ही सभागृहांना आणि राज्याला समजणे आवश्यक आहे. धनगर आरक्षणावरून सरकारने फसवणूक केली आहे. तसेच हे सरकार धनगर आरक्षणाच्या विरोधातील सरकार असल्याचेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2019 5:17 pm

Web Title: dhananjay munde vidhan parishad dhangar reservation blames government jud 87
Next Stories
1 आई वडिलांना सलाम! सायकलवारीत मृत्यू झालेल्या मुलाचे करणार अवयवदान
2 अंमली पदार्थ विकणाऱ्यांना थेट फाशी देण्याचा कायदा करा-अजित पवार
3 नाशिकच्या सायकलवारीत ९ वर्षांच्या मुलाचा ट्रकच्या धडकेत मृत्यू
Just Now!
X