|| दिगंबर शिंदे

धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या आरेवाडीच्या बनात आरक्षणाच्या मागणीसाठी दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेळाव्यात आरक्षण मागणीसाठी येळकोट येळकोटचा गजर झाला असला तरी या मेळाव्याच्या निमित्ताने नेत्यांचा समाजाच्या नावावर राजकारण करण्याचा हेतू स्पष्टपणे दिसून आला. भाजपने अदखलपात्र ठरविलेल्या गोपीचंद पडळकर यांनी लाखाची गर्दी जमवून आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला. तर गर्दीपेक्षा दर्दी महत्त्वाचे असल्याचे सांगत माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी सवतासुभा बिरोबा बनातील काशीलिंगाच्या साक्षीने मांडला.

Meenakshi Shinde
आचारसंहितेच्या कालावधीत बचतगटांना आनंद आश्रमातून अनुदान वाटप ? शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
bombay high court nitesh rane speech examine
मीरा-भाईंदर हिंसाचार प्रकरण : नितेश राणेंसह दोन भाजपा नेत्यांची भाषणं तपासण्याचे कोर्टाचे आदेश
navi mumbai municipal administration playing hide and seek with tenders amount
कामांच्या निविदा रकमांबाबत लपवाछपवी; नवी मुंबई शहरातील ठेकेदार महापालिका प्रशासनाच्या संगनमताची शंका
sangli municipal corporation marathi news
सांगली: महिलेवर अत्याचार करणाऱ्या पालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक

धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्याची मागणी गेली काही वष्रे सातत्याने होत आहे. सध्या या समाजाचा इतर मागास वर्गामध्ये समावेश असून अधिक लाभ मिळावा यासाठी समाजाचे आंदोलन सुरू आहे. मात्र, शासकीय परिपत्रकामध्ये धनगर आणि धनगड असा फरक करण्यात आल्यामुळे आपल्या समाजाला अनुसूचित जमातीच्या सोयीसवलती मिळत नसल्याचा आक्षेप आहे. यातून या समाजाचे गेली २० वर्षांहून अधिक काळ आंदोलन सुरू आहे. आता तर टाटा सामाजिक संस्थेच्या अहवालानुसार राज्यात धनगर आणि धनगड या जाती भिन्न असल्याचे स्पष्ट झाल्याने हा समाज आक्रमक होत आहे.

लोकसभा निवडणुकीपुर्वी समाजाच्या नेत्यांना एकत्र करीत भाजपने पहिल्या मंत्रिमंडळाच्या बठकीत धनगर आरक्षणाचा मुद्दा निकाली काढला जाईल असे सांगत काँग्रेसची परंपरागत मतपेढी काबीज केली. मात्र, प्रशासकीय पातळीवर भाजपाला हा निर्णय घेणे किती अवघड आहे हे सत्तेवर येताच जाणीव झाली असून गेली चार वष्रे या समाजाची आरक्षणावरून फसवणूक होत असल्याचा दृढ समज समाजाचा झाला आहे.

समस्त धनगर समाजाचे आराध्य दैवत म्हणून असलेल्या कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडीचा बिरोबाच्या बनात धनगर समाजाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी गेली दोन वष्रे मेळाव्याचे आयोजन केले जाते. याचा प्रारंभ गोपीचंद पडळकर यांनी केला. या मेळाव्यात विविध राजकीय पक्षांमध्ये कार्यरत असलेल्या नेत्यांना विनाअट प्रवेश होता. मात्र, आपली राजकीय भूमिका काहीही  असली तरी समाजाच्या मेळाव्यात केवळ समाजाच्या प्रश्नांची चर्चा व्हावी अशी कल्पना होती.

मात्र पहिल्याच मेळाव्यात पडळकर यांनी समाजाच्या नेत्यांनी समाजासाठी फारसे काही केले नसल्याचा आक्षेप व्यासपीठावर घेताच जेष्ठ नेते आ. गणपतराव देशमुख यांनी अध्यक्षपदावरून खडे  बोल सुनावल्याने पडळकर यांना दोन पावले माघार घ्यावी लागली होती. मात्र, ती माघार म्हणजे पुन्हा चार पावले पुढे जाण्याची चाल होती हे कालच्या मेळाव्यावरून स्पष्ट झाले. पडळकर यांच्या मेळाव्याला झालेली गर्दी आणि तीही तरुणाईची यावरून वारे बदलत असल्याची जाणीव झाली असे म्हणायला हरकत नाही.

मेळाव्यावरूनही देवस्थान समितीमध्ये दोन गट पडल्याचे स्पष्ट झाले. मंदिरापासून १० किलोमीटर परिसरात कोणताही मेळावा घेण्यासाठी परवानगी देऊ नये अशी मागणी होत असतानाच मेळाव्यासाठी मदान तयार करण्याची लगबग सुरू होती.

धनगर समाजाला हक्काची जाणीव करून देणाऱ्या स्व. शिवाजीराव शेंडगे यांचे सुपुत्र माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी बदलत्या वाऱ्याची दिशा लक्षात घेऊन सवतासुभा मांडण्याचा प्रयत्न केला. शेंडगेंनी आयोजित केलेल्या मेळाव्यात नेत्यांची गर्दी आणि कार्यकर्त्यांची मंदी अशी स्थिती दिसून आली. अगदी भाजपचे खा. विकास महात्मेपासून अण्णा डांगे, शेंडगे कुटुंबातील रमेश शेंडगे, सुरेश शेंडगे, सेनेत असलेले जयसिंग शेंडगे ही मंडळी एका व्यासपीठावर आली. मात्र, लोकांची गर्दी पडळकर यांच्या मेळाव्याकडे जादा दिसली.

कवठेमहांकाळ तालुक्यातच नव्हे तर ज्या ज्या मतदारसंघांमध्ये धनगर समाज निर्णायक आहे अशा ठिकाणी यापुढील काळात हे आरक्षणाच्या मागणीतून संघटन करण्याचा प्रयत्न यापुढील काळात होणार आहे. पाटीदार समाजाच्या आंदोलनामुळे राष्ट्रीय पातळीवर चच्रेत आलेले हार्दकि पटेल यांनीही या मेळाव्यात आरक्षण न मिळण्यास नागपूरचे षड्यंत्र कारणीभूत असल्याचे सांगत आपला भाजपविरोध गळी उतरविण्याचे प्रयत्न केले.

लोकसभा निवडणुकीवेळी स्व. गोपीनाथ मुंडे यांनी बहुजन समाजाची ताकद भाजपच्या तंबूत आणण्याचे यशस्वी प्रयत्न केले. या प्रयत्नातूनच पडळकर भाजपात सामील झाले.

आरेवाडीमध्ये धनगर आरक्षणावरून भाजपविरुद्ध एल्गार पुकारण्यात आला आहे. भाजपलाही या मेळाव्याची दखल घ्यावी लागणार आहे. कारण लोकसभा निवडणुकीत केवळ कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यात पक्षाकडे हक्काने आलेला मतदार पुन्हा  वेगळ्या वाटेवर गेला तर फटका बसण्याची शक्यता बळावत चालली आहे. पडळकर अदखलपात्र ठरविले तर मेळावा अदखलपात्र ठरवून आत्मघातकी ठरण्याची चिन्हे नाकारता येणार नाहीत.

आरेवाडीच्या मेळाव्याला झालेली गर्दी हा भाजपलाच फटका असल्याचा समज करून काँग्रेसला आनंदाच्या उकळ्या फुटत असल्या तर तेही पक्षाच्या दृष्टीने नुकसानकारकच ठरणार आहे. कारण ही गर्दी भविष्यात सेनेच्या तंबूत जाण्याची चिन्हे दिसत आहेत. तशी बोलणीही मातोश्रीवर झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. सांगली लोकसभेसाठी शिवसेनेला चेहरा आणि नेता हवा आहे. सेनेला पडळकर यांच्या माध्यमातून हा चेहरा गवसला तर नवल नाही.

गर्दीमागे कोण?

आरेवाडीला शेंडगे आणि पडळकर यांचे दोन स्वतंत्र मेळावे झाले. पडळकरांच्या मेळाव्याला गर्दी आणि शेंडगेंच्या मेळाव्याला दर्दी असे सांगितले जात असले तरी एक प्रकारे खासदार संजयकाका पाटील यांना दिलेला इशारा असेच म्हणावे लागेल. जिल्ह्य़ाचे नेतृत्व करण्यास एकही लायक भाजपात नसल्याचा शोध पडळकर यांनी लावताच त्यांना अदखलपात्र ठरविण्यासाठी खासदार पुढे सरसावले. लाखाची गर्दी जमवून त्यांनी खासदारांना इशारा दिला आहे. तर ही गर्दी जमविण्यासाठी भाजपातूनच कुमक पुरविण्यात आल्याची वदंता आहे.