03 June 2020

News Flash

धवलसिंह मोहिते पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

सोलापूर जिल्ह्यातील सदाशिवनगर येथील शंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव धवलसिंह मोहिते पाटील यांनी मंगळवारी दुपारी 'मातोश्री'वर शिवसेनेत प्रवेश केला.

| August 19, 2014 01:08 am

सोलापूर जिल्ह्यातील सदाशिवनगर येथील शंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव धवलसिंह मोहिते पाटील यांनी मंगळवारी दुपारी ‘मातोश्री’वर शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन धागा बांधून आणि भगवा ध्वज हाती देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले.
गेल्या काही महिन्यांपासून धवलसिंह मोहिते पाटील शिवसेना नेत्यांच्या संपर्कात होते. आगामी विधानसभा निवडणुकीत ते सोलापूर जिल्ह्यातील माढा किंवा करमाळा या पैकी एका विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. धवलसिंह मोहिते पाटील शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यताही वर्तविण्यात येते आहे. दरम्यान, या वृत्ताला धवलसिंह मोहिते पाटील यांच्याकडून कोणताही दुजोरा मिळालेला नाही.
धवलसिंह मोहिते पाटील महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्षही आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे या परिषदेचे अध्यक्ष आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2014 1:08 am

Web Title: dhavalsingh mohite patil meets uddhav thackeray
Next Stories
1 दोन लाखांसाठी विवाहितेचा खून
2 जुगार खेळताना माजी महापौरासह १२ जणांना अटक
3 महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न संपला असल्याचा सिद्धरामय्या यांचा निर्वाळा
Just Now!
X