माजी सहकार राज्यमंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव तथा अकलूजवळील सदाशिवनगरच्या शंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी मंगळवारी दुपारी मुंबईत ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली व शिवसेनेत प्रवेश केला.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष तथा अपक्ष जिल्हा परिषद सदस्य असलेले डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील हे सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांचे नातू तर राष्ट्रवादीचे नेते खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे आहेत. गेल्या काही वर्षांपासून मोहिते-पाटील घराण्यात राजकीय कलह सुरू झाल्यानंतर गेल्या माढा लोकसभा निवडणुकीत खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या विरोधात त्यांचे सख्खे बंधू प्रतापसिंह मोहिते-पाटील हे अपक्ष म्हणून उभे होते. परंतु त्यांना दारुण निराशा पत्करावी लागली. तद्नंतर त्यांचे पुत्र डॉ. धवलसिंह यांनी स्वत:चे राजकीय अस्तित्व जपण्यासाठी शिवसेनेचा भगवा झेंडा खांद्यावर घेतला.
शिवसेनेत प्रवेश घेण्यामागील डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांचा हेतू स्पष्ट झाला नाही. आगामी विधानसभा निवडणुकीतून माढा किंवा करमाळा मतदारसंघातून सेनेची उमेदवारी त्यांना मिळणार काय, तसा शब्द त्यांना दिला गेला काय, हे समजू शकले नाही. सोलापूर जिल्ह्य़ात एकीकडे काँग्रेस व राष्ट्रवादीतून अनेक तालुकास्तरावरील नेते शिवसेनेत दाखल झाले आहेत. यात माढय़ातील प्रा. शिवाजी सावंत, करमाळ्यातील नारायण पाटील, सांगोल्यातील माजी आमदार शहाजीबापू पाटील, बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत आदींचा प्रामुख्याने समावेश आहे. ही सर्व मंडळी सेनेतर्फे विधानसभेची निवडणूक लढवायला इच्छुक आहेत.

Sunetra pawar, Ajit Pawar,
अजित पवारांनी सपत्निक घेतले दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन; सुनेत्रा यांनी देवाला केली ‘ही’ प्रार्थना
cm eknath shinde criticizes uddhav thackeray
उद्धव ठाकरेंची ‘उठ-बस’सेना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; पाठिंब्यासाठी राज यांचे अभिनंदन
PM Modi Said Uddhav Thackeray Shivsena is Duplicate
“काँग्रेसबरोबर असलेली शिवसेना नकली, एकनाथ शिंदेच बाळासाहेब ठाकरे यांचे..”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य
UBT leader joins shiv sena shinde group
उबाठा गटाला धक्का, माजी मंत्र्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश; मिलिंद नार्वेकरांवर केले गंभीर आरोप